Home महाराष्ट्र निवडणुका सगळ्याच एकत्र घ्या किंवा… ; अजित पवारांचं रोखठोक मत

निवडणुका सगळ्याच एकत्र घ्या किंवा… ; अजित पवारांचं रोखठोक मत

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : निवडणुका सगळ्याच एकत्र घ्या किंवा थांबवायच्या असतील तर सर्वच थांबवा, या मतावर राज्य सरकार ठाम आहे, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित यांनी दिली आहे. माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना अजित पवारांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

हे ही वाचा : निवडणुकीआधी काँग्रेसच्या उमेदवाराविरुद्ध गुन्हा दाखल

चार-पाच राज्यात असाच प्रसंग आला होता. त्यावेळी न्यायव्यवस्थेनं निकाल वेगळा दिला होता आणि महाराष्ट्रात असा निकाल वेगळा दिला आहे. असं सांगतानाच राज्य सरकारनं ज्याच्यात दुरुस्ती केली होती, तो कायदा स्थगित केलेला नाही. मात्र ओबीसींच्या जागांवरील निवडणुका थांबवल्या आहेत, असं अजित पवार म्हणाले आहेत.

दरम्यान, राज्य चालवत असताना राज्यातील सर्वच घटकांना सोबत घेऊन जायचं असतं, तीच भूमिका महाविकास आघाडी सरकार ची आहे. पण आता बाकीच्या ओपन, एससी, एसटीच्या निवडणुका होणार आहेत आणि ओबीसींच्या होणार नाही हे न्यायाला धरून नाही, असंही अजित पवारांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी –

शिवसेनेचे नगरसेवक कॉंग्रेसचा झेंडा घेऊन निवडणूक रिंगणात; चर्चांना उधाण

संजय राऊत यांच्याविरोधात भाजपा नगरसेविकांनी केली तक्रार दाखल

माझ्या बोलण्याचा विपर्यास केला गेला, महिलांचा अपमान करणं हा माझा स्वभाव नाही- आशिष शेलार