पुणे : टाळ मृदुगांचा गजर आणि करत फुलांनी सजवलेल्या ज्ञानोबा माऊलींचा जयघोष करत एस. टी. बसमधून मानाच्या नऊ पालख्या पंढरपूरकडे मार्गस्थ झाल्या. वारीच्या इतिहासात पहिल्यांदाच संतांच्या पालख्या अशाप्रकारे बसमधून पांडुरंगाच्या भेटीला जाणार आहेत.
कोरोनामुळे अगदी मोजक्या वारकऱ्यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. दरवर्षी काही दिवसांनंतर पोहोचणाऱ्या पालख्या यंदा मात्र अवघ्या काही तासातच पंढरपुरात दाखल होणार आहे.
दरम्यान, पुण्यातून संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका फुलांनी सजवलेल्या एस. टी. बसमधून पंढरपूरकडे मार्गस्थ झाल्या. दुपारी पादुकांना नैवेद्य दाखवल्यावर मानाच्या वारकऱ्यांनी पादुका हातात घेऊन बसमध्ये ठेवल्या. त्यानंतर उपस्थित ग्रामस्थ आणि वारकऱ्यांनी माऊली माऊली असा जयघोष केला अन् बस पंढरीकडे मार्गस्थ झाली.
महत्वाच्या घडामोडी-
पृथ्वीराज चव्हाणांचा भाजपवर गंभीर आरोप; नमो अॅपबद्दल केली मोठी मागणी
भाजपच्या ‘या’ नेत्याने दिला घरचा आहेर; पडळकरांच्या वक्तव्यावरून म्हणाले;…
खुषखबर! “कोरोनावरील पहिली लस भारतात तयार”
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; TikTok, Helo सह 59 चिनी Mobile Apps वर बंदी