आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षाचे चिन्ह आणि नाव गोठवलं. त्यानंतर आता निवडणूक आयोगाने ठाकरे आणि शिंदे गटाला नवीन नाव दिले आहे.
शिंदे गटाला ‘बाळासाहेबांची शिवसेना’ नाव मिळालं आहे. ठाकरे गटाला ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ हे नाव मिळालं आहे. यावर आता उद्धव ठाकरे गटाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
हे ही वाचा : ‘बाळासाहेबांची शिवसेना’ नाव मिळाल्यानंतर एकनाथ शिंदेंनी दिली पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…
‘उद्धव बाळासाहेब ठाकरे नाम ही काफी हैं.’ मशाल चिन्ह मिळाले याचा आम्हा सर्वांनाच आनंद आहे. आम्हाला जे चिन्ह देण्यात आले ती धगधगती मशाल अन्याय, अत्याचाराविरोधात, जटिल राजकारणाविरुद्ध, कटकारस्थान करणाऱ्यांविरोधात पेटत राहील, असं सुषमा अंधारेंनी म्हटलं आहे.
दरम्यान, गोरगरिबांच्या झोपड्यांमधील अंधार दूर करण्यासाठी, अन्याय दूर करण्यासाठी ही मशाल कायम धगधगत राहील, असंही सुषमा अंधारे म्हणाल्या.
महत्त्वाच्या घडामोडी –
“मोठी बातमी! ‘या’ निवडणूकीसाठी आशिष शेलार-शरद पवारांची युती”
राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येणार?; राज यांच्या ‘त्या’ विधानानं चर्चांना उधाण
“निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय; ठाकरेंकडून शिवसेनेच्या ‘नव्या’ नावासह, चिन्हाचं पोस्टर जाहीर”