“सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी करण जोहरला चौकशीसाठी बोलवणार”

0
184

मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी आतापर्यंत अनेकांना चौकशीला बोलावलं जात आहे. आता या प्रकरणात धर्मा प्रॉडक्शनचे प्रमुख करण जोहर यांना चौकशीसाठी बोलवण्याची शक्यता आहे.

नुकतंच गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिग्दर्शक करण जोहर यांना चौकशीसाठी बोलवलं जाणार असल्याचे वक्तव्य केलं होतं. यावेळी खरंच चित्रपट क्षेत्रात घराणेशाही आहे का? याबाबतची चौकशी केली जाणार आहे.

दरम्यान, सुशांत सिंहच्या आत्महत्येचा पोलीस सध्या याप्रकरणाचा तपास करत आहेत. आतापर्यंत पोलिसांनी 38 जणांचे जबाब नोंदवले आहेत. यात सुशांतचे कुटुंबिय, त्याचे नातेवाईक, अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते यांचा समावेश आहे.

महत्वाच्या घडामोडी-

राष्ट्रवादीच्या ‘या’ मंत्र्याला कोरोनाची लागण

मंत्रालयात जायचा कंटाळा आला म्हणून…; मनसेचा मुख्यमंत्र्यांना टोला

कोरोनाच्या बाबतीत जगाच्या तुलनेत भारतातील स्थिती चांगली- नरेंद्र मोदी

राज्यात दोन मुख्यमंत्री; एक मातोश्रीत, तर दुसरे…; भाजपच्या ‘या’ नेत्याचे एका दगडात दोन पक्षी’

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here