मुंबई : सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूला काल एक वर्ष पूर्ण झालं, याच पार्श्वभूमीवर राज्याचे अल्पसंख्याकमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी भाजपावर निशाणा साधलाय.
सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येच्या नावावर भाजपाला बिहार निवडणूक लढवायची होती, म्हणून सीबीआयला पुढे करुन महाराष्ट्र सरकारला बदनाम करण्याचे कटकारस्थान रचण्यात आले होते.” असं नवाब मलिक म्हणाले आहेत.
सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणाला आज एक वर्ष पूर्ण होत असताना, या प्रकरणाचं ज्या प्रकारे राजकारण झालं आहे, हे लोकांच्या समोर आहे. मुंबई पोलीस रीतसर तपास करत असताना, या घटनेचा एफआयआर बिहारमध्ये दाखल करण्यात आला. मग बिहार सरकारने निर्णय घेऊन हा तपास सीबीआयकडे सोपवला आणि एक वर्ष होऊन देखील याच्यात काय निष्पन्न झालं? या तपासात आत्महत्येशिवाय दुसरं काही आहे का? याबाबत आजपर्यंत सीबीआयकडून कुठलीही माहिती देण्यात आलेली नाही, असंही नवाब मलिक यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या घडामोडी –
राजकारण चंचल नसतं, शिवसेनेची विचारधारा चंचल झाली आहे- प्रवीण दरेकर
ह्यांचं फक्त एकच काम, याला फोडा त्याला जोडा; अशोक चव्हाणांची भाजपवर जोरदार टीका
प्रशांत किशोर यांच्या कोणी लागू नका नादी…; रामदास आठवलेंचा कविता स्टाईलमध्ये शरद पवारांना टोला
खाल्लेल्या ताटात थुंकणे हीच शिवसेनेची सवय; निलेश राणेंचा हल्लाबोल