“मनसेत सुसाट पक्षप्रवेश; राज ठाकरेंच्या भोंग्याच्या निर्णयावरून अनेक मुस्लिम युवकांचा मनसेत प्रवेश”

0
1596

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

नागपूर : आगामी निवडणूकीसाठी मनसेनं जोरदार कंबर कसली असून पक्षात गेल्या काही दिवसांपासून जोरदार इनकमिंग सूरू आहे.

नागपुरातील काही मुस्लिम युवकांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला. दक्षिण पश्चिम विभाग अध्यक्ष तुषार गिऱ्हे यांच्या पुढाकाराने झालेल्या या प्रवेश कार्यक्रमात मनसेचे राज्य सरचिटणीस हेमंत गडकरी यांनी प्रवेश करणाऱ्या सर्व मुस्लिम युवकांचे त्यांच्या गळ्यात मनसेचा दुप्पटा घालून स्वागत केलं.

हे ही वाचा : …महाराष्ट्राला मुन्नाभाईच्या नावाने मामू मिळाले; शिवसेना नेत्या दिपाली सय्यद यांचा राज ठाकरेंना टोला

या मुस्लिम युवकांमध्ये काझिम अन्सारी, दिलशाद अन्सारी, मोहम्मद कुरेशी, शमशाद अन्सारी, जफर इकबाल, साजिम मामु, रजाऊल अन्सारी यांचा समावेश होता. अनिधीकृत भोंगा प्रकरणी मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांची भूमिका योग्य असून ते कुठल्याही जाती धर्माला विरोध करीत नाही ही खात्री पटली म्हणून आम्ही मनसेत प्रवेश करीत आहे असे प्रवेश करणाऱ्या सर्वांनी मत व्यक्त केलं.

दरम्यान, यावेळी शहर अध्यक्ष अजय ढोके यांनी प्रवेश करणाऱ्या सर्वांचे दूरध्वनीवर स्वागत केलं. हेमंत गडकरी यांचे सह तुषार गीरे, विभाग उपाध्यक्ष चेतन बोरकुटे, शाखा अध्यक्ष शिरीष पटवर्धन (गुरुजी) उत्तम रागीट, रोहित चकोले इत्यादी उपस्थित होते.

महत्वाच्या घडामोडी –

…महाराष्ट्राला मुन्नाभाईच्या नावाने मामू मिळाले; शिवसेना नेत्या दिपाली सय्यद यांचा राज ठाकरेंना टोला

“उद्धव ठाकरेंकडून संभाजीराजेंना शिवसेना प्रवेशाची ऑफर; लवकरच शिवबंधन हाती बांधणार?”

यापुढे महिलेवर हात उगाराल तर…; पुणे मारहाण प्रकरणी सुप्रिया सुळेंचा भाजपला इशारा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here