दुबई : आजच्या आयपीएलच्या मुंबई इंडियन्स विरूद्ध राॅयल चैलेंजर्स बेंगलोर यांच्यात खेळल्या गेलेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सने राॅयल चैलेंजर्स बेंगलोरचा 5 विकेट्सनी पराभव केला.
मुंबई इंडियन्सने टाॅस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. राॅयल चैलेंजर्स बेंगलोरने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 6 गडी गमावत 164 धावा केल्या. बेंगलोरकडून देवदत्त पडीक्कलने 45 चेंडूत 74 धावांची खेळी केली. तर जोश फिलिपने 24 चेंडूत 33 धावा केल्या. तर मुंबईकडून जसप्रित बुमराने 3, तर ट्रेंट बोल्ट, राहुल चहर, कायरान पोलार्डने प्रत्येकी 1 विकेट घेतली.
धावांचा पाठलाग करताना मुंबईने हे लक्ष्य 19.1 षटकात 5 विकेट गमावत पूर्ण केले. मुंबईकडून सुर्यकुमार यादवने सर्वाधिक 43 चेंडूत नाबाद 79 धावा केल्या. तर इशान किशनने 19 चेंडूत 25 धावा, क्विंटन डीकाॅकने 19 चेंडूत 18 धावा केल्या. बेंगलोरकडून मोहम्मद सिराज व युझवेंद्र चहलने प्रत्येकी 2 विकेट, तर ख्रिस माॅरिसने 1 विकेट घेतली.
महत्वाच्या घडामोडी-
केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांना कोरोनाची लागण
शिवसेनेचा भगवा जरुर फडकेल, पण तो भगवा उद्धव ठाकरे यांच्या एकट्याच्याच हातात असेल- किरीट सोमय्या
मुंबई इंडियन्सने टाॅस जिंकला; प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय
खोटं बोलण्याच्या स्पर्धेत आम्ही पंतप्रधान मोदी यांच्याशी बरोबरी करू शकत नाही- राहुल गांधी