Surendra Pathare | पुण्यात भाजपची ताकद वाढली; सुरेंद्र पठारे यांनी केला प्रवेश

0
22

पुणे : गेल्या काही दिवसांपासून राजकारणात विविध घडामोडी घडत आहेत. महानगरपालिका निवडणूक रंगू लागली आहे. अनेक पदाधिकारी-कार्यकर्त्यांचा सत्ताधारी भाजपमध्ये प्रवेश होत आहे. असे असताना आता प्रभावशाली नेते सुरेंद्र पठारे यांनी भारतीय जनता पक्षामध्ये अधिकृत प्रवेश केला आहे. त्यांच्या या प्रवेशामुळे वडगाव शेरी मतदारसंघातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता असून, भाजपाला थेट आणि मोठा फायदा होणार असल्याचे चित्र आहे.

पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक इच्छुकांकडून सत्ताधारी भाजपमध्ये प्रवेश केला जात आहे. त्यातच आता पुण्यातही अनेक इच्छुकांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. असे असताना वडगाव शेरी मतदारसंघातील राजकारणात मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहे. स्थानिक पातळीवर प्रभावशाली नेते सुरेंद्र पठारे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

सुरेंद्र पठारे यांची ओळख ही संघटन कौशल्य, कार्यकर्त्यांचा मजबूत गट आणि स्थानिक प्रश्नांवरील ठोस भूमिका अशी आहे. गेल्या अनेक वर्षांपासून त्यांनी सामाजिक व नागरी प्रश्नांवर प्रभावीपणे काम केले असून, त्यांचा मोठा जनाधार आहे. हा जनाधार आता भाजपाच्या पाठीशी उभा राहणार असल्याने, आगामी निवडणुकांत भाजपाची स्थिती अधिक मजबूत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

विरोधी पक्षांना मोठा धक्का

पठारे यांच्या प्रवेशामुळे मतदारसंघातील मध्यमवर्गीय, युवक आणि स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये भाजपाविषयी सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे. अनेक कार्यकर्ते आणि समर्थक त्यांच्या नेतृत्वाखाली भाजपात सहभागी होण्याची तयारी दर्शवत आहेत. त्यामुळे विरोधी पक्षांना मोठा धक्का बसल्याचे म्हटले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here