Surendra Pathare : अभियांत्रिकी दृष्टिकोनातून समाजकार्यास दिशा देणारे नेतृत्व म्हणजे सुरेंद्र पठारे

0
25

सुरेंद्र पठारे हे कर्तृत्ववान, कार्यशील आणि जनतेशी नाळ जोडलेले नेतृत्व म्हणून पूर्व पुण्यात ओळखले जातात. खराडी व वडगावशेरी परिसरात समाजकार्यासाठी आणि जनसेवेसाठी त्यांनी स्वतःला पूर्णपणे वाहून घेतले असून, सर्वसामान्यांच्या उन्नतीसाठी सातत्याने विविध उपक्रम राबवले आहेत. निष्काम व निःस्वार्थ सेवाभावामुळे नागरिकांच्या मनात त्यांच्याविषयी आदर आणि विश्वास निर्माण झाला आहे.

राजकीय-सामाजिक नेतृत्वासोबतच सुरेंद्र पठारे हे एक कुशल उद्योजक म्हणूनही परिचित आहेत. रिअल इस्टेट, तंत्रज्ञान आणि कृषी-तंत्रज्ञान यांसारख्या विविध क्षेत्रांत त्यांनी यशस्वी उद्योग उभारले आहेत. उद्योग क्षेत्रातील सक्षम नेतृत्व म्हणून पुणे शहरातील उद्योगवृद्धीस चालना देण्यासाठी त्यांनी विविध माध्यमांतून प्रयत्न केले असून, स्थानिक पातळीवर रोजगार निर्मितीला हातभार लावला आहे.

जनतेच्या सेवेसाठी सदैव तत्पर असलेल्या कुटुंबात वाढ झाल्यामुळे ‘समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो’ ही मूल्ये सुरेंद्र पठारे यांच्यात लहानपणापासून रुजली. त्यांचे वडील बापूसाहेब पठारे यांनी महाराष्ट्रात अनेक दशकांपासून लोकप्रतिनिधी म्हणून जनसेवेत मोलाचे योगदान दिले आहे. निस्वार्थ सेवेसाठी ओळखल्या जाणाऱ्या या कुटुंबाचा वसा पुढे नेत सुरेंद्र पठारे यांनी जनहित आणि जनसेवेची परंपरा सक्षमपणे सुरू ठेवली आहे.

एकूणच पूर्व पुण्याच्या सर्वांगीण विकासात सुरेंद्र पठारे यांच्या अविरत आणि निःस्वार्थ जनसेवेचा मोलाचा वाटा असून, ते नागरिकांसाठी विश्वासार्ह नेतृत्व म्हणून पुढे येत आहेत.

पठारे यांनी पुण्यातील नामांकित अभियांत्रिकी महाविद्यालय COEP येथून यंत्र अभियांत्रिकी (Mechanical Engineering) ची पदवी प्राप्त केली आहे. अभियांत्रिकी शिक्षणातून मिळालेला विश्लेषणात्मक आणि उपाययोजनात्मक दृष्टिकोन त्यांनी सामाजिक क्षेत्रात प्रभावीपणे वापरला आहे. नागरी पातळीवरील मूलभूत प्रश्न, दैनंदिन नागरिकांच्या अडचणी तसेच पायाभूत सुविधांशी संबंधित समस्यांवर शाश्वत आणि सोप्या पद्धतीने तोडगा काढण्यासाठी हा दृष्टिकोन उपयुक्त ठरत आहे.

समजात सकारात्मक बदल घडविण्याची त्यांची तळमळ विविध उपक्रमांतून स्पष्टपणे दिसून येते. क्रीडाक्षेत्र आणि युवकांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आयोजित कार्यक्रम, आरोग्य तपासणी शिबिरे, रक्तदान शिबिरे तसेच सामाजिक प्रश्नांवर जनजागृती मोहिमा अशा अनेक उपक्रमांच्या माध्यमातून त्यांनी आजवर असंख्य लोकांच्या आयुष्यात प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरीत्या सकारात्मक बदल घडवून आणला आहे.

याशिवाय वडगावशेरी परिसरात पायाभूत सुविधा बळकट करणे, सार्वजनिक सेवा सुधारणा आणि नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी त्यांनी स्थानिक प्रशासनासोबत सातत्याने समन्वय साधत काम केले आहे. रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, आरोग्य व मूलभूत सुविधांबाबत नागरिकांच्या समस्या प्रशासनापर्यंत पोहोचवून त्यावर उपाययोजना करण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत.

सुरेंद्र पठारे यांच्या कामाची सूत्रबद्ध पद्धत, अभ्यासू वृत्ती आणि प्रभावी समस्या निराकरण क्षमता याबाबत सर्वत्र प्रशंसा होत आहे. खराडी, वडगावशेरी, विमाननगर, येरवडा, लोहगाव, कल्याणीनगर आणि आसपासच्या परिसरातील नागरिकांचे जीवनमान सुधारण्यासाठी ते सदैव तत्पर आणि कार्यरत असतात. नागरिकांचे प्रश्न समजून घेऊन ते सोडविण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणारा कार्यशील आणि होतकरू तरुण नेतृत्व म्हणून सुरेंद्र पठारे यांच्याकडे पाहिले जात आहे.

रक्तदान महाशिबीर

कोरोनासारख्या भयावह परिस्थितीत राज्यात रक्ताचा पडणारा तुटवडा व राज्यात रक्ताचा मुबलक साठा असावा, या उद्देशाने चार तीन वर्षे प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून रक्तदान महाशिबिराचे आयोजन केले. २०२१ साली १६४४, २०२२ साली ३४५३, २०२३ साली ३५९३ व व मागील तिन्ही वर्षीचे विक्रम मोडीत काढत २०२४ साली ३६७१ रक्तपिशव्यांचे संकलन झाले. रक्तदात्यांचा उत्साह व समाजाच्याप्रती असलेली कर्तव्यभावना समाधान देणारी आहे. दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या (२६ जानेवारी) दिवशी अशाच प्रकारच्या रक्तदान महाशिबिर आयोजित करण्याचा मानस सुरेंद्र पठारे यांचा आहे.

लसीकरण आपल्या दारी मोहीम

कोरोना विषाणूच्या संसर्गाला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने हाती घेतलेल्या लसीकरण मोहिमेला गती मिळावी व जास्तीतजास्त नागरिकांना लसीकरणाचा लाभ मिळावा, या दृष्टीने ‘लसीकरण आपल्या दारी ही मोहीम राबवून शहरातील विविध भागांतील नागरिकांचे लसीकरण करून घेतले. जेणेकरून, कोरोनासारख्या भयंकर आजारापासून त्यांचा बचाव होईल. या मोहिमेंतर्गत जवलपास ५४ हजारांपेक्षा जास्त नागरिकांना फायदा झाला.

आधार कार्ड शिबिरे

नागरिकांना आधार कार्डसंबंधी येणाऱ्या विविध समस्या लक्षात घेऊन आधार कार्ड शिबिर सुरू करत सुरेंद्र पठारे यांनी एक महत्त्वाचे पाऊल उचलत प्रशासकीय यंत्रणेवरचा बराच ताण कमी करण्यासाठी हातभार लावला. सातत्याने राबवण्यात येणाऱ्या या शिबिरांमुळे नागरिकांना सहजपणे त्यांच्या आधार कार्डसंबंधी विविध सुविधांचा लाभ घेणे शक्य झाले आहे.

नागरिकांसाठी टोल फ्री सुविधा

नागरिकांच्या विविध समस्येच्या तसेच तक्रारींच्या निवारणासाठी १८००२५८६०९० या २४X ७ चालू असणाऱ्या टोल फ्री क्रमांकांची सुविधा सुरू केली. या मार्फत रुग्णवाहिका, आधार कार्ड, प्लंबर, इलेक्ट्रिशियन, कचरा व्यवस्थापन यासंबंधी सेवांचा लाभ घेता येतो. आतापर्यंत मोठ्या प्रमाणावर कुटुंबांनी व नागरिकांनी या सेवेचा लाभ घेतला आहे. या उपक्रमाला नागरिकांचा सकारात्मक प्रतिसाद आहे.

एसपीएफ स्पोर्ट्स मेनिया व विविध क्रीडा प्रशिक्षण उपक्रम

सुरेंद्र पठारे फाऊंडेशन स्पोर्ट्स मेनियाच्या रूपाने सांस्कृतिक राजधानी असलेल्या आपल्या पुण्यात विविध खेळांच्या भव्य स्पर्धा पार गेल्या तीन वर्षांपासून संपन्न होत आहे. स्विमिंग, स्केटींग, लॉन टेनिस, व्हॉलीबॉल, बॉक्स फुटबॉल, टेबल टेनिस, बॅडमिंटन व क्रिकेट या मैदानी क्रीडा प्रकारांबरोबरच बुद्धिबळ, कॅरम या बैठ्या क्रीडा प्रकारांच्या समावेश असतो. सर्व वयोगटांसाठी नागरिकांसाठी या स्पर्धांचे आयोजन केले जाते. ८००० हून अधिक नागरिकांचा सहभाग या गेल्या दोन्ही वर्षी होता.

एकूणच क्रीडा सस्कृती रुजवण्यासाठी, चालना देण्यासाठी, खेळाडूंना स्पर्धात्मक वातावरणात आपले कौशल्ये आजमवण्यासाठी, आपल्या भागातून पदकविजेते खेळाडू घडवण्यासाठी तसेच नागरिकांना क्रीडा स्पर्धा पाहण्याचा आस्वाद घेता यावा, हा एसपीएफ स्पोर्ट्स मेनियाचा उद्देश आहे.

तसेच, वडगावशेरी भागातील खेळाडूंमधील गुणवत्ता आणि प्रतिभा ओळखून त्यांना योग्य मार्गदर्शन तसेच दर्जेदार प्रशिक्षण मिळावे, म्हणून प्रशिक्षण कार्यक्रमही राबवले जातात. ज्यात ध‌न्विन्द्या प्रशिक्षण, महिला क्रिकेट प्रशिक्षण, स्केटींग व फुटबॉल प्रशिक्षण, बास्केटबॉल प्रशिक्षण इ. समावेश आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here