…. म्हणून सुप्रिया सुळेंनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचे मानले आभार, म्हणाल्या…

0
1393

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे या सातत्यानं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर सातत्यानं टीका करताना दिसत आहेत. मागील काही आठवड्यांपासून राष्ट्रवादी आणि मनसेमध्ये एकमेकांवर आरोप प्रत्यारोपां सुरू असताना आज नाशिकमध्ये पत्रकार परिषदेत बोलताना सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंचे आभार मानले.

पवारांविरोधात फेसबुकवर आक्षेपार्ह मजकूर प्रसारित केल्याप्रकरणी अभिनेत्री केतकी चितळेला शनिवारी ठाणे पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केली आहे. याविषयी सुप्रिया सुळेंना विचारण्यात आलं असता, यावर प्रतिक्रिया देताना सुळेंनी राज ठाकरेंचे आभार मानले.

हे ही वाचा : “…येत्या काळात भाजपा काय आहे, हे दाखवून देऊ”; रावसाहेब दानवेंचा मुख्यमंत्र्यांना इशारा

शरद पवारांवर करण्यात आलेल्या या टीकेनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसहीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी ही टीका योग्य नसल्याचं म्हटलं होतं. यावरून सुळेंनी या तिन्ही नेत्यांचे आभार मानले. सुळे म्हणाल्या, “यानिमित्त मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे या तिघांचेही जाहीर आभार मानते. त्यांनी या टीकेच्या विरोधात भूमिका घेतली, यातून मराठी संस्कृती दिसते. आम्ही सगळ्यांनी मिळून यामध्ये सातत्य ठेवलं पाहिजे. कधीही दुसऱ्या कोणावर जर वेळ आली तर मी स्वत: त्या कृतीच्या विरोधात उभा राहीन. कारण, ही जी विकृती सुरू झालेली आहे, ती समाजासाठी वाईट आहे. आज ती आमच्याबद्दल झाली उद्या ती तुमच्याबद्दल होऊ शकते. अशी जी प्रवृत्ती आहे तिचं जगातील कुठल्याही समाजात कोणीचं समर्थन करु शकत नाही.

महत्वाच्या घडामोडी –

“…येत्या काळात भाजपा काय आहे, हे दाखवून देऊ”; रावसाहेब दानवेंचा मुख्यमंत्र्यांना इशारा

“शरद पवारांवरील आक्षेपार्ह पोस्ट भोवली; अभिनेत्री केतकी चितळेला 18 मे पर्यंत पोलिस कोठडी”

शरद पवारांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या अभिनेत्री केतकी चितळेला, राज ठाकरेंनी झापलं, म्हणाले…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here