मुंबई : काही दिवसांपूर्वी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीचे सर्वसर्वा शरद पवार यांनी त्यांची मुलगी अर्थात खासदार सुप्रिया सुळे यांना मुख्यमंत्रीपदी बसवायचे आहे, असं वक्तव्य केलं होतं. यावर शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.
यावेळी शरद पवारांनी महाराष्ट्राची पहिली महिला मुख्यमंत्री म्हणून आपण सुप्रिया सुळे यांच्याकडे पाहता का? असा प्रश्न विचारण्यात आला. यावर उत्तर देताना शरद पवार म्हणाले, सुप्रिया सुळेंना राज्याच्या राजकारणात रस नाही. त्यांना राष्ट्रीय राजकारणात रस आहे. सुप्रियांना देशपातळीवर अनेक पुरस्कार मिळाले आहेत. त्यांना राष्ट्रीय स्तरावर काम करायला आवडतं. प्रत्येकाचा एक इंट्रेस्ट असतो. सुप्रियांचा इंट्रेस्ट तिकडे आहे., असं शरद पवार म्हणाले.
महत्वाच्या घडामोडी-
“शरद पवार एकवेळ कोरोनाबाबत निगेटीव्ह राहतील पण धनगर आरक्षणाबाबत पॉझिटिव्ह आहेत”
“MDH मसालेचे मालक महाशय धर्मपाल गुलाटी यांचं हृदयविकाराच्या धक्क्यानं निधन”
…त्यामुळे आता ठाकरे सरकारला हिंदू शब्दाचेही वावडे वाटू लागले आहे- अतुल भातखळकर
बॉलिवूड यूपीला नेण्याचा प्रयत्न यशस्वी होणार नाही- रामदास आठवले