“सुप्रिया सुळेंचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे सुळे वेगळे आहेत”

0
352

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

ठाणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज ठाणे येथेभव्य सभा भरवण्यात आली. या सभेत त्यांनी जोरदार टोलेबाजी करत महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांवर टीका केली आहे. यावेळी त्यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळें यांच्यावरही निशाणा साधला आहे.

हे ही वाचा : “केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या उंचीएवढा दुसरा नेता कोकणात नाही”

”सुप्रिया सुळे म्हणतात, लाव रे तो व्हिडीओ म्हणणारे एका नोटिशीने बदलतील याचं मला आश्चर्य वाटतं. मला आश्चर्य या गोष्टीचं वाटतं की एकाच घरात राहून अजित पवारांच्या घरी रेड पडते, पण तुमच्या घरी रेड पडत नाही याचं कारण मला कळेल का? सुप्रिया सुळेंनी बोलायचं नाही. यांचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे सुळे वेगळे आहेत, असं राज ठाकरे म्हणाले आहेत.

दरम्यान, लाव रे तो व्हिडीओ म्हणणारे एका नोटीशीमुळे एवढे बदलतील याचं मला कौतुक आणि आश्चर्य वाटतं. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे, त्यांनी हा आरोप याआधीही केलाय. अशा गोष्टींमध्ये इनकनस्टीस्टंटली कन्सीस्टंट आहेत, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या होत्या.

महत्वाच्या घडामोडी –

वकीलांनी आपली बाजू कोर्टात मांडायची असते, रस्त्यावर नाही; प्रकाश आंबेडकरांचा सदावर्तेंना टोला

“…म्हणून मनसेच्या जवळ जायला भाजपा घाबरत आहे”

भाजपाचे लोक काय धुतल्या तांदळाचे आहेत का?; जयंत पाटलांचा सवाल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here