“मुंबई महापालिका निवडणुकीआधी सर्वोच्च न्यायालयाचा भाजपला झटका”

0
298

मुंबई : युती तुटून आघाडीचं राजकारण सुरू झाल्यानंतर भाजपने मुंबई महापालिकेच्या विरोधी पक्षनेतेपदावर दावा सांगितला होता. यानंतर मुंबईच्या महापौर व शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर यांनी भाजपचा हा दावा फेटाळला होता. यावर भाजपने कोर्टात धाव घेतली होती.

मुंबई महानगरपालिकेच्या गेल्या निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरूनही आम्हाला डावलून किशोरी पेडणेकर यांनी काँग्रेसला विरोधी पक्षनेते पद दिल्याचा आरोप भाजपने केला होता. मुंबई हायकोर्टाने या प्रकरणात भाजपविरोधात निकाल दिला होता. यानंतर भाजपने सर्वोच्च न्यायालयाचे दार ठोठावले. मात्र सर्वोच्च न्यायालयाने देखील भाजपची याचिका फेटाळून लावली आहे.

महत्वाच्या घडामोडी –

तयार रहा! माझं आणखी एक गाणं येतंय; अमृता फडणवीसांचा ट्रोलर्संना इशारा

मुलीनं काही बरं वाईट केलं तर त्याला मेहबूब शेख जबाबदार- तृप्ती देसाई

हिंमत असेल तर पाकिस्तान बांगलादेशमध्ये सत्ता स्थापन करून दाखवा- उद्धव ठाकरे

“…तर भविष्यात शिवसेना देशाचं नेतृत्व करेल”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here