Home महाराष्ट्र सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला चपराक दिली; देवेंद्र फडणवीसांची राज्यसरकारवर टीका

सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला चपराक दिली; देवेंद्र फडणवीसांची राज्यसरकारवर टीका

मुंबई : स्थलांतरित मजुरांबाबत सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकार परिषद घेतली आहे. या पत्रकार परिषदेत त्यांनी राज्य सरकारवर टीका केली.

एखादा मुद्दा विरोधी पक्षाने चांगल्याकरता मांडला तर त्याचा विचार करुन सरकारने कारवाई केली पाहिजे. दुर्देवाने तसं न झाल्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला चपराक दिली, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

जे मुद्दे आमच्यावतीने उचलले जात होते त्यावर राज्य सरकार म्हणत होतं की, तुम्ही विरोधाला विरोध करत आहात. तुम्ही महाराष्ट्रविरोधी आहात. मग आता महाराष्ट्र सरकार सर्वोच्च न्यायालयाला महाराष्ट्रविरोधी ठरवणार का? असा सवालही देवेंद्र फडणवीसांनी यावेळी केला.

महत्वाच्या घडामोडी-

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस उद्यापासून कोकण दौऱ्यावर

महाराष्ट्रात सर्कस सुरू असल्याचं पवारांना मान्य- चंद्रकांत पाटलांचं पवारांना टोला

…पण आपल्या राज्यपाल महोदयांना याची जास्ती माहिती असेल; अंतिम वर्षाच्या परीक्षांवरुन पवारांचा कोश्यारींना टोला

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर अनेक जण टीका करत आहेत, पण…; जितेंद्र जोशीने केलं मुख्यमंत्र्यांच कौतुक