दुबई : आजच्या दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद खेळल्या गेलेल्या सामन्यात सनरायजर्स हैदराबादने दिल्ली कॅपिटल्सने 15 धावांनी पराभव केला.
सनरायजर्स हैदराबादने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 4 विकेट गमावत 163 धावा केल्या. हैदराबादकडून जॉनी बेयरस्टोने 48 चेंडूत 53 धावा, डेव्हिड वॉर्नरने 33 चेंडूत 45 धावा, केन विल्यमसनने 26 चेंडूत 41 धावा केल्या. दिल्लीकडून अमित मिश्रा व कगिसो रबाडाने प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.
धावांचा पाठलाग करताना दिल्लीची सुरूवात खराब झाली. सलामीला आलेल्या पृथ्वी शाॅ केवळ 2 धावांवर आऊट झाला. नंतर आलेल्या कर्णधार श्रेयस अय्यर व शिखर धवनने डाव सावरण्याचा प्रयत्न करत 40 धावांची भागीदारी केली. पण त्याचवेळी श्रेयस अय्यर 17 धावांवर आऊट झाला. त्याला राशिद खानने आऊट केले. श्रेयसपाठोपाठ शिखर धवनही आऊट झाला. धवनने 31 चेंडूत 34 धावा केल्या.
नंतर शिमरन हेटमायर व रिषभ पंतने डाव सावरण्याचा प्रयत्न केला. दोघांनी चांगली फलंदाजी करत संघाची धावसंख्या 15 व्या षटकात 104 वर नेली. पण मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात शिमरन हेटमायर आऊट झाला. हेटमायरने 12 चेंडूत 21 धावा केल्या. नंतर रिषभ पंतही मोठा फटका खेळण्याच्या नादात आऊट झाला. रिषभने 27 चेंडूत 28 धावा केल्या. त्यानंतर मार्कस स्टाॅयनिसही लगेच आऊट झाला. शेवटी दिल्लीने 20 षटकात 7 गडी गमावत 147 धावा केल्या. व अशा प्रकार सनरायजर्स हैदराबादने धावांनी सामना जिंकला. सनरायजर्स हैदराबादकडून ऱाशिद खानने 3 विकेट घेतल्या. तर भुवनेश्वर कुमारने 2 तर टी.नटराजन व खलील अहमदने 1 विकेट घेतली.
महत्वाच्या घडामोडी-
मनसेचं सरकार आल्यावर व्याजासकट हिशोब चुकता करू; मनसेचा राज्य सरकारला इशारा
“शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड कोरोनामुक्त”
आठवलेंचा एक आमदार-खासदार तरी आहे का?; आठवलेंच्या ऑफरवर शरद पवारांचा टोला
“राज्य सरकारकडून दसरा, नवरात्राैत्सवाची नियमावली जाहीर”