Home क्रीडा “सनरायर्झर्स हैदराबादचा किंग्स इलेव्हन पंजाबवर धमाकेदार विजय”

“सनरायर्झर्स हैदराबादचा किंग्स इलेव्हन पंजाबवर धमाकेदार विजय”

दुबई : आजचा आयपीएलचा सामना सनरायर्झर्स हैदराबाद विरूद्ध किंग्स इलेव्हन पंजाब यांच्यात खेळल्या गेलेल्या सामन्यात सनरायर्झर्स हैदराबादने किंग्स इलेव्हन पंजाबचा 69 धावांनी पराभव केला.

हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वाॅर्नरने टाॅस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हैदराबादने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 6 गडी गमावत 201 धावा केल्या. हैदराबादकडून जाॅनी बेअरस्टाेने 55 चेंडूत 97 धावा केल्या. ज्यात त्याने 7 चाैकार व 6 षटकार मारले. तर डेव्हिड वाॅर्नरने 39 चेंडूत 52 धावा केल्या. केन विलियम्सनने 10 चेंडूत 20 धावा केल्या. तर अभिषेक शर्माने 6 चेंडूत 12 धावा केल्या. पंजाबकडून रवी बिश्नोईने 3 अर्शदिप सिंगने 2, तर मोहम्मद शमीने 1 विकेट घेतली.

धावांचा पाठलाग करताना पंजाबची सुरूवात खराब झाली. मयंक अगरवाल केवळ 9 धावांवर रनआऊट झाला. नंतर आलेला यंग खेळाडू प्रभसिमरन सिंग याने काही फटके खेळले. मात्र फटकेबाजी करण्याच्या नादात प्रभसिमरन सिंग खलील अहमदच्या गोलंदाजीवर प्रियम गर्गकडे झेल देऊन आऊट झाला. प्रभसिमरन सिंगने 8 चेंडूत 11 धावा केल्या. सिंगनंतर सेट होत असलेला कर्णधार राहुलही मोठा फटका खेळण्याच्या नादात आऊट झाला. राहुलने 16 चेंडूत 11 धावा केल्या. नंतर आलेल्या निकोलस पूरन व ग्लेन मैक्सवेलने डाव सावरण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, निकोलस पूरनने आपले अर्धशतक केवळ 17 चेंडूत पूर्ण केले. दोघांनी 47 धावांची भागीदारी केली. पण चोरटी धाव घेण्याच्या नादात मैक्सवेल प्रियम गर्गच्या डायरेक्ट थ्रोवर आऊट झाला. मैक्सवेलने 12 चेंडूत केवळ 7 धावा केल्या. नंतर आलेला मनदिप सिंगही केवळ 4 धावांवर आऊट झाला. तरी पूरन अजूनही मैदानात होता. तो एकबाजूने फटकेबाजी करत होता. पण त्याला दुसऱ्या फलंदाजांकडून साथ मिळत नव्हती. मात्र तोही धावगती वाढवण्याच्या प्रयत्नात आऊट झाला. पूरनने 37 चेंडूत 77 धावांची खेळी केली. पूरन आऊट झाल्यावर पुढच्याच चेंडूवर मोहम्मद शमीही राशीदच्या गोलंदाजीवर आऊट झाला. पूरन आऊट झाल्यावर तळातील फलंदाज काही खास करू शकले नाहीत. व पंजाबने 20 षटकात निर्धारीत सर्वबाद 132 धावा केल्या.

हैदराबादकडून राशिद खानने 3, खलील अहमद व टी.नटराजनने 2 तर अभिषेक शर्माने 1 विकेट घेतली.

महत्वाच्या घडामोडी-

रिपब्लिक चॅनेलच्या अर्णब गोस्वामींना अटक करा; शिवसेनेची मागणी

डेव्हिड वाॅर्नर व बेअरस्टाेची शानदार 160 धावांची सलामी; हैदराबादचे पंजाबसमोर 202 धावांचे लक्ष्य

“शिवसेनेनं केलेला हा धोका भाजपशी नव्हे, तर महाराष्ट्राच्या जनतेशी झाला आहे”

डेव्हिड वाॅर्नर आणि जाॅनी बेअरस्टाेची नाबाद शतकी भागीदारी