आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपनं कंबर जोरदार कसली असून पक्षात गेल्या काही दिवसांपासून जोरदार इनकमिंग सूरू आहे. अशातच आता भाजपनं काँग्रेसला मोठा धक्का दिला आहे.
काँग्रेसचे माजी नगरसेवक नितीश गंगाप्रसाद ग्वालवंशी यांनी आज पक्षाला रामराम ठोकत भाजपचा झेंडा हाती घेतला. आगामी महापालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर ग्वालवंशी यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानं काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.
हे ही वाचा : राजू शेट्टींनी स्वतःसाठी शरद पवारांकडे मागितलं होतं कॅबिनेट मंत्रीपद; ‘या’ माजी आमदाराचा गाैफ्यस्फोट
नितीश ग्वालवंशी यांनी आज काँग्रेसचे शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांच्याकडे राजीनामा पाठविला. त्यात त्यांनी काँग्रेसच्या सदस्य पदाचा राजीनामा देत असल्याचं म्हटलं आहे. आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस नागपुरात होते. हा मुहूर्त साधून त्यांनी नितीन गडकरी यांचे घर गाठले. त्याठिकाणी त्यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश झाला.
महत्वाच्या घडामोडी –
शिवसेना की राष्ट्रवादी?; नितीन गडकरींनी दिलं भन्नाट उत्तर, म्हणाले…
“शिवसेनेचा काँग्रेसला दणका, ‘या’ मोठ्या नेत्यानं हाती बांधलं शिवबंधन”