Home महाराष्ट्र पुढील वर्ष भराचा माझा पगार अन् CM फंडात जमा करा- जितेंद्र आव्हाड

पुढील वर्ष भराचा माझा पगार अन् CM फंडात जमा करा- जितेंद्र आव्हाड

मुंबई  : राज्यात करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकार अनेक उपाययोजना राबवत आहेत. याच पार्श्वभूमीवर अनेक तीर्थक्षेत्रे, उद्योगपती तसंच राजकारणी पुढे येऊन मदतीची घोषणा करू लागले आहेत. यातच मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी माझ्या ड्रायव्हरचा अन् पी. ए. चा पगार कापा अन् CM फंडात जमा करा, असं म्हटलं आहे.

शासनाला माझी विनंती आहे. पुढील वर्ष भराचा माझा पगार गोरगरीब कापा आणि महाराष्ट्रातील गरजवंतांच्या कल्याणायासाठी वापरावा, अशी विनंती जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.

दरम्यान, महाराष्ट्र शासनाकडून जे काही आर्थिक सहकार्य मिळते म्हणजे माझ्या पी. ए. आणि ड्रायव्हर ह्यांचा देखील शासनाकडून मिळणारा पगार असा कोणताच पगार आम्हाला नको. आमचा पगार सरकारी तिजोरीत जमा करावा, असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे.


महत्वाच्या घडामोडी-

महाराष्ट्र उध्दवजींच्या सुरक्षित हातात आहे याचा अभिमान वाटतो- जितेंद्र आव्हाड

सांगलीत घराबाहेर पडणाऱ्यांना पोलिसांचा दणका; केल्या तब्बल 350 वाहने जप्त

राज्य सरकारचा मोठा निर्णय; मुख्यमंत्र्यांसह लोकप्रतिनिधींच्या वेतनात 60 टक्के कपात

घरी परतणाऱ्या त्या गरीब मजुरांचा काय दोष?, शरद पवार संतापले