Home महाराष्ट्र गोपाळकृष्ण शाळेतील विद्यार्थ्यांनी उभारली संकल्पांची गुढी

गोपाळकृष्ण शाळेतील विद्यार्थ्यांनी उभारली संकल्पांची गुढी

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

पुणे : आम्ही मोबाईलचा वापर कमी करणार, रात्री लवकर झोपणार, अवांतर वाचनाची पुस्तके वाचणार, टिव्ही नाही बघणार, मैदानी खेळ खेळणार असे एक ना अनेक संकल्प करत विद्यार्थ्यांनी संकल्प गुढी उभारली. हा उपक्रम गोखलेनगर येथील गोपाळकृष्ण प्राथमिक विद्यामंदिर या शाळेत गुढी पाडव्यानिमित्त घेण्यात आला. विद्यार्थ्यांनी अगदी छोट्या छोट्या गोष्टीकडे लक्ष वेधून त्या गोष्टी करण्याचा संकल्प यावेळी केला. त्याबरोबर गुढी पाडवा थीमवर आधारित चित्र रंगभरण स्पर्धा घेण्यात आली.

सदर उपक्रमाची संकल्पना आणि नियोजन उपक्रमशील शिक्षक रणजित बोत्रे यांनी केले. सध्याच्या परिस्थितीत टिव्ही, मोबाईल, उशिरा झोपणे, जंक फूड खाणे यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतात. यावर विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती होण्यासाठी सदर उपक्रम घेण्यात आल्याचे मुख्याध्यापिका जयश्री कासार यांनी सांगितले. गुढी पाडव्याची माहिती विशाल चव्हाण यांनी मुलांना सांगितली. यावेळी ज्येष्ठ शिक्षिका गीतांजली कांबळे, मंदाकिनी बलकवडे, रणजित बोत्रे,विशाल चव्हाण उपस्थित होते.

महत्त्वाच्या बातम्या – 

जिल्हास्तरीय नृत्याविष्कार स्पर्धेला शाळांचा उस्फूर्त प्रतिसाद; विद्यार्थ्यांकडून अप्रतिम सादरीकरण

MVM सेमी इंग्लिश शाळेत बोरन्हाण संपन्न, काळे कपडे घालून विद्यार्थ्यांचा उत्साह

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांची मोठी घोषणा; 12 लाखांपर्यंत उत्पन्न आयकरमुक्त

शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का; ‘या’ बड्या नेत्याचा तडकाफडकी राजीनामा