राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जोरदार इन्कमिंग ; ‘या’ दिग्गजांनी हाती बांधले घड्याळ !

0
868

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

पुणे : आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीने आपली कंबर जोरदार कसली असून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जोरदार इन्कमिंग पाहायला मिळत आहे. आता वाघोली तालुका हवेली येथे 30 दिग्गजांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

शिरूर-हवेलीचे आमदार अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली व पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष प्रदीप गारटकर, हवेली तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष दिलीप वाल्हेकर व इतर यांच्या प्रयत्नातून या दिग्गजांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे घड्याळ हाती बांधले.

दरम्यान, या पक्षांतरात वाघोली तालुका हवेली येथे माजी जिल्हा परिषद सदस्य रामभाऊ दाभाडे यांचा मोठा हात असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. त्यामुळे याठिकाणी दाभाडे गटाचे वर्चस्व निर्माण झाल्याचं चित्र पहायला मिळत आहे.

महत्वाच्या घडामोडी –

आम्ही निर्लज्जांना शिवसेनेत घेत नाही; संजय राऊतांचा टोला

दोन पक्षांचे आपल्याला संकेत, राज्यात केंव्हाही निवडणुक लागू शकते; आशिष शेलारांनी टाकला बाॅम्ब

…तर नाना पटोले अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष संदर्भातही बोलू शकतात; देवेंद्र फडणवीसांचा टोला

गुलाब चक्रीवादळामुळं समजलं, गुलाबरावांच्या डोक्यात किती दुष्काळ आहे; मनसेचा पलटवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here