“राष्ट्रवादीत जोरदार इनकमिंग; मिरजेत नेत्यांसह अनेक कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश”

0
879

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

सांगली : आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीने आपली कंबर जोरदार कसली असून पक्षात गेल्या काही दिवसांपासून जोरदार इनकमिंग सूरू आहे.

हे ही वाचा : “हिंदुत्त्वाबद्दल विचारधारा एक असेल तर राज ठाकरेंनी भाजपसोबत जावं”

मिरज पूर्व भागातील विविध पक्षातील नेत्यांसह अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा हाती घेतला. मिरज येथे राष्ट्रवादीकडून भव्य असा पक्षप्रवेशाचा सोहळा पार पडला. यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी नव्याने पक्षात प्रवेश केलेल्यांचं स्वागत करत पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या.

आज पक्षात प्रवेश केलेल्या सर्वांचे मी स्वागत करतो. मिरज तालुका संघटित व्हावा. एकत्रित व्हावा ही माझी जुनी इच्छा आज पूर्ण होताना दिसत आहे. पक्षाच्या संघटनेसाठी एकसंधपणे कार्य केले तर भविष्यात मिरज तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद ही मोठ्या प्रमाणात वाढलेली दिसेल., असं जयंत पाटील म्हणाले.

दरम्यान, परिपक्व व अनुभवी असे मा. शरद पवार साहेबांचे नेतृत्व आपल्या पक्षाकडे आहे. त्यामुळे जनतेच्या इतर पक्षांपेक्षा अधिक अपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आहे, असं आवाहन जयंत पाटलांनी यावेळी केलं.

महत्वाच्या घडामोडी –

…त्यामुळे संजय राऊतांना कमी-जास्त प्रतीचा गांजा कसा असतो ते चांगलं कळतं; नितेश राणेंची टीका

उत्तराखंडमध्ये भाजपला धक्का; सहा आमदारांचा लवकरच काँग्रेसमध्ये प्रवेश

“देशाला राज ठाकरेंसारख्या नेत्याची गरज, ते जे बोलतात ते करतात”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here