आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
राज्य शासनात विलिनीकरणाच्या मागणीसाठी पाच महिन्यांपासून आंदोलन करत असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांनी आज पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईमधील सिल्व्हर ओक या निवास्थानाबाहेर आंदोलन सुरू केलं.
आक्रमक झालेले कर्मचारी अचानकपणे आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईमधील सिल्व्हर ओक या घराच्या आवारात शिरले. यावेळी संतप्त कर्मचाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करत चप्पलफेक केली. त्यानंतर काही वेळातच शरद पवार यांच्या कन्या आणि खासदार सुप्रिया सुळे सिल्व्हर ओकवर दाखल झाल्या. त्या दाखल होताच एसटी कर्मचाऱ्यांनी त्यांना घेरलं. त्या वारंवार कर्मचाऱ्यांना शांत बसण्याची विनंती करत होत्या.
हे ही वाचा : भोंग्यावरून राज ठाकरेंना आव्हान देणाऱ्या सुजात आंबेडकरांना मनसेचं जोरदार उत्तर, म्हणाले…
दरम्यान, एसटी कर्मचाऱ्यांशी शांतपणे बोलण्याची विनंती करत होत्या. मात्र तरीही जमावाने आक्रमकता सोडली नाही. सुप्रिया सुळे यांना घेराव घातला. अखेर सुरक्षारक्षक आणि पोलिसांच्या कड्याच्या माध्यमातून मोकळ्या ठिकाणी येत त्यांनी माध्यमांच्या साहाय्याने एसटी कर्मचाऱ्यांना हात जोडून आवाहन केलं.
महत्वाच्या घडामोडी –
“किरीट सोमय्या देशद्रोही व्यक्ती, त्याची जागा फक्त तुरूंगातच”
“राष्ट्रवादीत पक्षप्रवेशाचा धुमधडाका, ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीनं हाती बांधलं घड्याळ”
गुणरत्न सदावर्ते यांच्याकडून देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील यांचं काैतुक, म्हणाले…