Home महाराष्ट्र “साताऱ्यात आज रात्रीपासून कडक लाॅकडाऊन”

“साताऱ्यात आज रात्रीपासून कडक लाॅकडाऊन”

सातारा : वाढत्या कोरोना रूग्णांच्या पार्श्वभूमीवर राज्यात अंशत: लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतरही कोरोनाची आकडेवारी ही दिवसेंदिवस वाढत असताना पहायला मिळत आहे. तसेच कोरोनामुळं मृत्याच्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर साताऱ्यात कडक लाॅकडाऊनची घोषणा साताऱ्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केली आहे.

साताऱ्यात आज रात्रीपासून 7 दिवस कडक लाॅकडाऊन करण्याचा निर्णय बाळासाहेब पाटील यांनी घेतला आहे. गेल्या आठवडाभर दररोज सुमारे 2 हजार 500 च्या आसपास कोरोना बाधितांची नोंद होताना पहायला मिळत होती. तर जवळपास 500 च्या आसपास बाधितांचा मृत्यू झाला. अशा परिस्थितीत कडक लॉकडाऊन करणे गरजेचं असल्याचे मत साताराकरांचे होते. तसेच सातारा कोविड डिफेन्डर गृपच्या वतीनेही कडक लॉकडाऊनची मागणी करण्यात आली होती. याच पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात असल्याची माहिती मिळत आहे.

महत्वाच्या घडामोडी –

“भाजपाचे राज्य म्हणजे गाढवांचा गोंधळ आणि लाथांचा सुकाळ”

‘त्या’ पक्षाला उघडं करण्याचं काम भाजप करणार; अदर पुनावाला प्रकरणात आशिष शेलारांचा मोठा गाैफ्यस्फोट

बंगाल निवडणुकीतील पराभवानंतर पाटील डिस्टर्ब झालेत; वडेट्टीवारांचा चंद्रकांत पाटलांना टोला

…त्यामुळे चंद्रकांत पाटलांनी मग्रूरपणे बोलू नये- रुपाली चाकणकर