Home महाराष्ट्र सांगलीत उद्या मध्यरात्रीपासून कडक लाॅकडाऊन; पालकमंत्री जयंत पाटील यांची घोषणा

सांगलीत उद्या मध्यरात्रीपासून कडक लाॅकडाऊन; पालकमंत्री जयंत पाटील यांची घोषणा

सांगली : वाढत्या कोरोना रूग्णांच्या पार्श्वभूमीवर राज्यात अंशत: लाॅकडाऊन जाहीर करूनही कोरोना रूग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. तसेच कोरोना मृतांची संख्याही वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर सांगलीचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी सांगलीत कडक लाॅकडाऊनची घोषणा केली आहे.

काल सांगली जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या 1568 वर पोहोचली तर 40 रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला, ही बाब अतिशय गंभीर आहे. परिस्थिती आटोक्यात आणायची असेल, तर लॉकडाऊन हा एकमेव पर्याय आहे. त्यामुळे प्रशासनाशी चर्चा करून सांगली जिल्ह्यात संपूर्ण लॉकडाऊनचा निर्णय आम्ही घेत आहोत., असं ट्विट करत जयंत पाटील लाॅकडाऊनबाबतची घोषणा केली आहे.

आपल्याला ऑक्सिजन काठावर मिळतंय, प्रचंड ताकद खर्च करून बाहेरून ऑक्सिजन मिळवावे लागत आहे. औषधांबाबतही प्रश्न निर्माण होत आहेत, म्हणून ही शृंखला मोडण्यासाठी बुधवार दि. 5 मे रोजी मध्यरात्रीपासून जिल्ह्यात 8 दिवसांचा कडक लॉकडाऊन लावला जाईल, असं ट्विट करत जयंत पाटील यांनी लाॅकडाऊनबाबत घोषणा केली.

जीवनावश्यक वस्तूंपेक्षा आपल्या सर्वांचे जीवन महत्त्वाचे आहे, त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यातील नागरिकांना हा लॉकडाऊन यशस्वी करण्यासाठी सहकार्य करण्याची विनंती करतो. तुम्हा सगळ्यांच्या मदतीनेच आपल्याला कोरोनावर मात करायची आहे. घरीच रहा, सुरक्षित रहा!, असंही जयंत पाटील म्हणाले.

 

महत्वाच्या घडामोडी –

“चंद्रकांत पाटील यांनी छगन भुजबळांची तात्काळ माफी मागावी”

तुम्ही सांगाल ते करायला न्यायदेवता म्हणजे सीबीआय, ईडी नाही; भुजबळांचा पलटवार

“…तर भाजप महाराष्ट्रात दुर्बिण घेऊन शोधला असता तरी सापडला नसता”

“साताऱ्यात आज रात्रीपासून कडक लाॅकडाऊन”