नागपूर : वाढत्या कोरोना रूग्णांच्या पार्श्वभूमीवर नागपूरमध्ये 21 मार्चपर्यंत लाॅकडाऊन घोषित करण्यात आला आहे.
नागपूरमध्येच नाहीतर ग्रामीण भागातही कोरोनाचे रूग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. याच पार्श्वभूमीवर नागपूरमध्ये 15 मार्च ते 21 मार्च पर्यंत कडक लाॅकडाऊन लावण्यात येईल, अशी घोषणा नागपूरचे पालकमंत्री नितीन राऊत यांनी यावेळी केली.
दरम्यान, लसीकरण सुरू राहील, अत्यावश्यक सेवा सुरू राहील, डोळ्यांचे दवाखाने आणि चष्म्याचं दुकान सुरू राहील, असंही नितीन राऊत यांनी यावेळी सांगितलं.
महत्वाच्या घडामोडी –
राज्यातील महाविकासआघाडीचा महासिनेमा 2024 पर्यंत चालेल- संजय राऊत
पश्चिम बंगालनंतर महाराष्ट्राचा नंबर, 3 महिन्यात सरकार पडेल- सुधीर मुनगंटीवार
“महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या राॅयल स्टोन बंगल्यात आत्महत्या करण्याचा प्रयत्न”
“महाराष्ट्राच्या इतिहासात ठाकरे सरकार हे लबाड सरकार म्हणून ओळखलं जाणार”