कोरोनाचा विषाणू नष्ट करण्यासाठी पुणेकरांने बनवलं अजब यंत्र

0
365

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

पुणे : कोरोना पासूनच्या ओमायक्रोन व्हेरिएंटच्या बचावासाठी इंडो टेक इंडस्ट्रियल प्रायव्हेट लिमिटेड कंपनीतर्फे कोरोना किलर मशीन तयार केले असून गेल्या दीड वर्षापासून या मशीन चे उत्पादन सुरू आहे. घर ,दवाखाना, ऑफिस ,महाविद्यालय, चित्रपटगृहे, नाट्यगृहे, सार्वजनिक ठिकाणे अशा ठिकाणी हे कोरोना किलर उपकरण बसविता येते.

विविध प्रकारचे करोना किल्लर उपकरण पुण्यातील इंडोटेक इंडस्ट्रियल प्रायव्हेट लिमिटेड ने तयार केले असून त्याला जागेनुसार ते वेगवेगळ्या ठिकाणी बसविता येणार असल्याची माहिती कंपनीचे संचालक भाऊसाहेब जंजिरे यांनी दिली. देशात व विदेशात या कोरोना किलर उपकरणची मागणी वाढली असून आयोनायझेशन पद्धतीद्वारे या मशिनची कार्यप्रणाली आहे. कोरोना विषाणू संपुष्टात आणण्यासाठी हे मशीन प्रभावी आहे.

हे ही वाचा : खुर्चीत गांजा मारून कोणालाही बोलता येते, पण…; शिवसेनेचा किरीट सोमय्यांवर निशाणा

आजमितीला मोठ्या प्रमाणावर ओमायक्रोन वाढत असून त्याला संपुष्टात आणण्यासाठी हे मशीन नक्कीच उपोयोगी ठरणार आहे. कोरोना विषाणू आल्यापासून तो विविध स्ट्रेण्ड बदलून येत आहे परंतु हे मशीन नक्कीच कोरोना विषाणूने स्ट्रेण्ड बदलला तरी त्याला नष्ट करण्याच काम करणार आहे या संशोधनाला आयसीएमआरची मान्यता मिळाली आहे अशी माहिती देखील इंडोटेक इंडस्ट्रियल प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक भाऊसाहेब जंजिरे यांनी दिली.

कोरोना ,डेल्टा किंवा ओमायक्रोन व कोरोना विषाणू बदलत असणाऱ्या स्ट्रेण्ड पासून बचाव करण्यासाठी हे मशीन घ्यावं असं देखील आवाहन करण्यात आलं.

महत्वाच्या घडामोडी – 

 विद्या चव्हाण-अमृता फडणवीसांच्या वादावर देवेंद्र फडणवीसांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले…

“केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना कोरोनाची लागण, ट्विट करत दिली माहिती”

“खासदार संजय राऊत यांच्या संपर्कात माजी आमदार, लवकरच शिवबंधन हाती बांधणार”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here