आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
औरंगाबाद : औरंगाबाद शहराच्या मध्यवर्ती भागातील संत एकनाथ रंगमंदिराच्या हे नाट्यगृह काही वर्षांपासून नूतनीकरणाच्या कारणास्तव बंद होते. नाट्यगृहाच्या नूतनीकरणासाठी तब्बल 10 कोटी रुपये खर्च करण्यात आले असून हे मंदिर उघडण्यासाठी सज्ज आहे. अशातच रंगमंदिराचे खासगीकरण करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.
एका खासगी काँट्रॅक्टरला रंगमंदिर चालवण्यासाठी दिले जाणार आहे. याविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. हे रंगमंदिर खासगी तत्त्वावर चालवण्यासाठी देऊ नये, अन्यथा आम्ही आंदोलन करू, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. त्यामुळे संत एकनाथ रंगमंदिराच्या खासगीकरणाचा वाद आता चांगलाच पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
हे ही वाचा : देशातील एकमेव प्लग अँड प्ले औद्योगिक प्रकल्प म्हणून भूमी वर्ल्ड प्रसिद्ध
खासगीकरणाच्या विरोधात नाहीत. पण नाट्यगृहासाठी 10 कोटी रुपये खर्च केले असतील, तर तुम्ही आता पुन्हा एका काँन्ट्रॅक्टरला हे का द्यायचं? हेच करायचं असतं तर 2017 मध्ये याविषयी टेंडर काढलं. तेव्हा या नूतनीकरणाचा अंदाजे खर्च अडीच हजार कोटी होता. तेव्हाच हे टेंडर काढून बीओटी तत्त्वावर करत त्याचे खासगीकरण करता आलं नसतं का? पण महापालिकेचे अधिकारी, शिवसेनेला या प्रकरणात पैसे खायचे होते, असं मनसेचे शहराध्यक्ष सुमित खांबेकर म्हणाले आहेत.
दरम्यान, यात आजपर्यंत तब्बल 10 कोटी रुपये खर्च कऱण्यात आलाय. खासगीकरणाचा हा सगळा प्रकार ठरलेलाच आहे. दिल्लीत अनेक सरकारी गोष्टी चांगल्या पद्धतीने चालू आहे. स्वतंत्र व्यवस्थापक आणि पाच-सहा जणांची टीम नेमून महापालिकादेखील नाट्यगृहाची व्यवस्था पाहू शकते. एवढा खर्च करून पुन्हा नाट्यगृह खासगीकरण करायचा निर्णय होत असेल तर आमचा याला स्पष्ट विरोध आहे, असंही सुमित खांबेकर यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या घडामोडी –
“शाहिस्तेखानाची नुसती बोटच छाटली होती तुझा पंजाच छाटलाच जाईल”; भाजप नेत्याचा इशारा
सूरज को डुबाने का इरादा रखते है कुछ नन्हे पटोले; अमृता फडणवीसांचा टोला
“नाना पटोलेंचं वक्तव्य हा राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा, पोलिसांनी त्यांना अटक करावी”