Home महाराष्ट्र गोबर, गोमूत्र आणि रामदेव ही थेरपीच आता बंद करा- नवाब मलिक

गोबर, गोमूत्र आणि रामदेव ही थेरपीच आता बंद करा- नवाब मलिक

मुंबई : राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी योगगुरू रामदेव बाबांवर निशाणा साधला आहे.

देशात कोरोनाचं संकट कायम आहे. अशावेळी गोमूत्र प्यायला सांगितलं जात आहे. रामदेव सारख्यांच्या औषधांच्या उद्घाटनाला केंद्रीय मंत्री जातात. हे नियम आणि कायद्याला धरून नाही. त्याचा आरोग्य मंत्रालयाने विचार केला पाहिजे., असं नवाब मलिक म्हणाले. ते माध्यमांशी बोलत होते.

रामदेव बाबांसारखे लोक गोमूत्र, गोबर आणि कोरोनिल काढतात. अॅलिओपॅथीवर संशय घेतात. त्यामुळे आयएमएने रामदेव बाबांना नोटीसा पाठवल्या पाहिजे, असं म्हणत गोबर, गोमूत्र आणि रामदेव ही थेरपीच आता बंद करा, असं नवाब मलिक यावेळी म्हणाले.

दरम्यान, ज्या औषधांना वैद्यकीय मान्यता नाही, त्याविरोधात सरकारने कठोर भूमिका घेतली पाहिजे. तसेच जे लोक चुकीची माहिती पसरवत आहेत, त्यांच्यावरही कठोर कारवाई केली पाहिजे, अशी मागणी नवाब मलिक यांनी यावेळी केली.

महत्वाच्या घडामोडी –

सांगली जिल्ह्यात लाॅकडाऊन वाढणार; पालकमंत्री जयंत पाटलांनी दिले संकेत

“मविआला केवळ भ्रष्टाचाराचा ‘ब्लॅक फंगस’ चिकटलेला नाही, तर पोलिसी वसुलीच्या ‘व्हाईट फंगस’चाही रोग जडलेला आहे”

“जयंत पाटील, बाळासाहेब थोरात यांच्यावर गुन्हा दाखल करा”

देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रासोबत नाहीत हे आता सिद्ध होवू लागलंय- नवाब मलिक