आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : उत्तरप्रदेशातील लखीमपूर खेरी येथील हिंसाचाराच्या निषेधार्थ महाराष्ट्रात सत्ताधारी मविआ सरकारने सोमवारी रोजी ‘महाराष्ट्र बंद’ ची हाक दिली होती. मात्र या बंदवेळी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून व्यापारी, दुकानदार आणि रिक्षाचालकांवर दमदाटी केल्याचे व्हिडिओ पुढे आले आहे. यावरून भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी शिवसेनेवर निशाणा साधलाय.
‘चोरुन दाखवलं, मारून दाखवलं, करून दाखवलं’, असं म्हणत अतुल भातखळकर यांनी शिवसेनेवर टीका केली आहे.
दरम्यान, कालच्या बंददरम्यान, जळगावात शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्यांनी दादागिरी केल्याचा एक भयानक प्रकार समोर आला. शिवसेनेच्या एका महिला कार्यकर्तीने किर्तीकुमार चोरडिया नामक व्यक्तीच्या आईस्क्रीम पार्लरमधून शीतपेय व खाद्यपदार्थ घेतले. पण पैसे न देताच तेथून काढता पाय घेतला. यावेळी दुकानदाराने पैशांची मागणी केली असता त्याला फरफटत नेले. तर ठाण्यात उपमहापौराच्या पतीकडून रक्षाचालकांना मारहाण करण्यात आल्याचा व्हिडीओ पुढे आला आहे. याप्रकरणी उपमहापौर यांचे पती माजी नगरसेवक पवन कदम यांच्यसह पाच जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. यासर्व घटनाक्रमावरुन भातखळकर यांनी शिवसेनेवर टीका केली आहे.
चोरुन दाखवलं
मारून दाखवलं…
करून दाखवलं https://t.co/2kRLliW4gM— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) October 12, 2021
महत्वाच्या घडामोडी –
मनसेत पक्ष प्रवेशाचं वादळ ; ‘या’ प्रसिद्ध उद्योजकासह शेकडो समर्थकांचा मनसेत प्रवेश
महाराष्ट्र बंदवेळी शिवसैनिकांची रिक्षा चालकाला मारहाण, उपमहापौरांच्या पतीसह पाच जणांवर गुन्हा
नारळ पाण्याच्या सेवनाने होतील ‘हे’ आरोग्यदायी फायदे! वाचा सविस्तर
“किल्ले कोरीगड”; तुम्हाला हा किल्ला माहिती आहे का?