“स्टाॅयनिस-आवेश खानची कमबॅक गोलंदाजी; लखनाैने, राजस्थानच्या हातातून विजय हिसकावून घेतला”

0
169

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

जयपूर : आयपीएलच्या 16 व्या हंगामाला सूरूवात झाली असून आजचा सामना राजस्थान राॅयल्स विरूद्ध लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात खेळला गेला. या सामन्यात लखनाैने राजस्थानचा 10 धावांनी पराभव केला.

या सामन्यात राजस्थानने टाॅस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. लखनाैने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकात 7 विकेट गमावत 154 धावा केल्या. लखनाैकडून सलामीवीर कायले मियर्सने 42 चेंडूत 4 चाैकार, 3 षटकारांसह 51 धावांची खेळी केली. कर्णधार के.एल. राहूलने 32 चेंडूत 39 धावा, मार्कस स्टाॅयनिसने 16 चेंडूत 21 धावा, तर विकेटकीपर फलंदाज निकोलस पूरनने 20 चेंडूत 2 चाैकार, 1 षटकारासह नाबाद 29 धावा केल्या. तर राजस्थानकडून रवीचंद्रन अश्विनने 2, तर ट्रेंट बोल्ट, संदीप शर्मा, जेसन होल्डरने प्रत्येकी 1 विकेट घेतली.

ही बातमी पण वाचा : “जनतेच्या मनातील मुख्यमंत्री, उद्धव ठाकरेच; नाशिकमधील असंख्य महिलांनी हाती बांधलं शिवबंधन”

दरम्यान, धावसंख्येचा पाठलाग करताना राजस्थानचा संघ 20 षटकात 6 विकेट गमावत 144 धावसंख्येपर्यंतच पोहचू शकला. राजस्थानकडून यशस्वी जैयस्वालने 35 चेंडूत 4 चाैकार, 2 षटकारासह 44 धावा केल्या. तर जाॅस बटलर 41 चेंडूत 40 धावा, देवदत्त पडीक्कलने 21 चेंडूत 26 धावा, तर रियान परागने 12 चेंडूत नाबाद 15 धावा केल्या. मात्र ते राजस्थानला विजय मिळवू देऊ शकले नाहीत.

महत्त्वाच्या घडामोडी –

“…तर शिंदे गटातील आमदार उद्धव ठाकरेंकडे परततील”, काँग्रेस नेत्याचं सूचक वक्तव्य

मुंबईच्या विजयाची हॅट्रिक; निर्णायक सामन्यात मुंबईचा हैदराबादवर 14 धावांनी विजय

जीवात जीव असेपर्यंत राष्ट्रवादीतच राहणार; भाजप प्रवेशाच्या चर्चांवर अजित दादांचं रोखठोक स्पष्टीकरण

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here