आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या आकडेवारीत घट होताना दिसत आहे. तसेच कोरोना आटोक्यात येत असल्यानं आता पुन्हा सगळं पूर्वपदावर येत आहे. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं अनलाॅकबाबत नवीन नियमावली जाहीर केली आहे.
राज्यातील 14 जिल्ह्यांमध्ये निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. या 14 जिल्ह्यांमध्ये 4 मार्चपासून नाट्यगृहे, चित्रपटगृहे, प्रेक्षणीय स्थळे, धार्मिकस्थळे 100 टक्के क्षमतेने सुरु राहतील. तर इतर जिल्ह्यांमध्ये हे सर्व 50 टक्के क्षमतेने सुरु राहतील. तसेच राज्य सरकारने लागू केलेली ही नियमावली 4 मार्चपासून लागू होणार आहे.
हे ही वाचा : “राष्ट्रवादीचा भाजपला दणका, राहुरीतील अनेक पदाधिकाऱ्यांनी हाती बांधलं घड्याळ”
दरम्यान, मुंबई शहर, मुंबई उपनगर, पुणे, भंडारा, सिंधुदुर्ग, नागपूर, रायगड, वर्धा, रत्नागिरी, सातारा, सांगली, गोंदिया, चंद्रपूर, कोल्हापूर, या 14 जिल्ह्यांमध्ये हे नवी नियमावली लागू होणार आहे.
महत्वाच्या घडामोडी –
एक महिला 15 वर्षे देशाची पंतप्रधान होती, पण तिनं…; रावसाहेब दानवेंची इंदिरा गांधींवर टीका
“कुछ मीठा हो जाये, सांगलीत जयंत पाटलांनी सदाभाऊ खोतांना भरवली कॅटबरी, चर्चांना उधाण”