आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : राज्यभरातील एसटी कर्मचारी आपल्या विविध मागण्यांसाठी राज्यव्यापी कामबंद आंदोलन करत आहेत. मात्र विलीनीकरण सोडून अन्य प्रश्नावर चर्चा करण्यास परिवहन मंत्री अनिल परब तयार असून विलीनीकरणाच्या मागणीसाठी कर्मचारी आक्रमक झाले आहेत. यावरून आता भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
हे ही वाचा : ‘ही विधानसभा शेवटची’; राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्याच्या घोषणेमुळं राजकीय खळबळ
ब्रिटिश गेले पण अजून त्यांचा प्रभाव आणि संस्कृती जायला तयार नाही, त्यामुळे तोडा आणि फोडा अशी भूमिका परिवहनमंत्री आणि सरकार घेताना दिसत आहे. एका बाजूला दबावाचं राजकारण, निलंबनाची कारवाई, सेवा समाप्तीच्या नोटिसा आणि.. आता हंगामी कर्मचार्यांवर दबाव आणून एसटी चालू करण्याचा केविलवाणा प्रयत्न सरकार करताना दिसत आहे, अशी टीका प्रवीण दरेकरांनी यावेळी केली.
आता हंगामी कर्मचार्यांवर दबाव आणून एसटी चालू करण्याचा केविलवाणा प्रयत्न सरकार करताना दिसत आहे. (2/2)
— Pravin Darekar – प्रविण दरेकर (@mipravindarekar) November 18, 2021
महत्वाच्या घडामोडी –
“शिवसेनेला 5 वर्षे मुख्यमंत्रिपद देऊन भाजपने पुन्हा महायुतीचं सरकार स्थापन करावं”
“नाना पटोले यांनी पुन्हा घेतली देवेंद्र फडणवीस यांची भेट; राजकीय चर्चांना उधाण”
अनिल देशमुखांना जो त्रास दिला जातोय, त्याचा एक-एक मिनिट मी वसूल करणार- शरद पवार