Home महाराष्ट्र “वाघनखं गमावलेल्या पक्षाचा ‘राज्य सरकार पुरस्कृत’ महाराष्ट्र बंद अयशस्वी”

“वाघनखं गमावलेल्या पक्षाचा ‘राज्य सरकार पुरस्कृत’ महाराष्ट्र बंद अयशस्वी”

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : महाविकास आघाडी सरकारने राज्यभरात बंद पुकारला आहे. बंदच्या पार्श्वभूमीवर सर्व कार्यकर्त्यांना शांततेत बंद करावा, असं आवाहन करण्यात आलं. यावरुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस कीर्तिकुमार शिंदे यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.

मुंबईचे अनभिषिक्त ‘बंदसम्राट’ कामगार नेते जॉर्ज फर्नांडिस यांच्यानंतरचे खरे राजकीय ‘बंदसम्राट’ म्हणजे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेच. त्या काळी शिवसेनेच्या वाघाने एक डरकाळी फोडली की, कडकडीत बंद पाळला जायचा. आताच्या शिवसेना कार्यप्रमुखांना- स्वतः मुख्यमंत्री असूनही- पोलिसांच्या गराड्यात दुकानदारांना ‘बंद करा, बंद करा’ असं सांगत ‘म्याव म्याव’ आवाहन करावं लागतं, असं कीर्तिकुमार शिंदे म्हणाले आहेत.

दरम्यान, वाघनखं गमावलेल्या पक्षाचा ‘राज्य सरकार पुरस्कृत’ बंद मुंबई- महाराष्ट्रात अयशस्वी ठरला यात आश्चर्य नाही. काय वाटलं असेल आज वंदनीय बाळासाहेबांना? असं म्हणत कीर्तिकुमार शिंदेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.

महत्वाच्या घडामोडी –

भाजपला मोठा धक्का, निवडणुकीपूर्वीच ‘या’ मोठ्या नेत्याचा काँग्रेसमध्ये प्रवेश

“महाविकास आघाडी सरकारचा पोपट झाला, तिन्ही पक्ष्यांनी उरली सुरली इज्जत मातीत मिळवली”

“संवेदनाहिन मनाचं आणि अर्धवट ज्ञानाचं परफेक्ट कॉम्बिनेशन म्हणजे अमृता वहिनी”

मनसे शेतकरी हत्येला पाठिंबा देत आहे का?; राष्ट्रवादीचा मनसेला सवाल