मुंबई : कोणत्याही परिस्थितीमध्ये मराठा आरक्षण वाचवलं पाहिजे. राज्य सरकारने याबाबत अधिक सजग होण्याची जास्त आवश्यकता आहे, असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले.
मराठा आरक्षण हा राजकारणापलिकडचा विषय आहे. आम्ही ज्यावेळेस मराठा आरक्षणाचं बिल आणलं, त्यानंतर केस झाली. आम्ही सर्व पक्षाच्या लोकांना एकत्रित करुन, सर्वांना माहिती देऊन आणि सर्वांची मदत घेऊन मराठा आरक्षणासाठी काम केलं, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
दरम्यान, सध्या मराठा आरक्षणाबाबत सुप्रीम कोर्टात केस सुरु आहे. ही केस आता अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यात आहे. या केसकडे सरकारचं लक्ष असणं आवश्यक आहे, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.
महत्वाच्या घडामोडी-
जो मुख्यमंत्री मंत्रालयात बसू शकत नाही तो मुख्यमंत्री हवाच कशाला?; नारायण राणेंचा सवाल
महाविकास आघाडी सरकारमध्ये कुरघोडीचा प्रयत्न सुरु आहे- देवेंद्र फडणवीस
वाट्टेल ती किंमत मोजून सरकार पाडण्यासाठी पैजा लागल्यात, पण…- संजय राऊत
निर्मला सीतारमण यांची काळ्या नागिणीशी तुलना; ‘या’ नेत्याची जीभ घसरली