Home महाराष्ट्र राज्य सरकारकडून कोकणातील शेतकऱ्यांची थट्टा, कोकणासाठी विशेष पॅकेज जाहीर करा- प्रविण दरेकर

राज्य सरकारकडून कोकणातील शेतकऱ्यांची थट्टा, कोकणासाठी विशेष पॅकेज जाहीर करा- प्रविण दरेकर

सिंधुदुर्ग : कोकणात शेतीचे भयंकर नुकसान झाले असून कोकणासाठी सरकारनं विशेष पॅकेजची घोषणा करावी, अशी महत्वाची मागणी भाजप नेते प्रविण दरेकर यांनी केली आहे. प्रविण दरेकर हे आज कणकवलीत नुकसान झालेल्या शेतीची पाहणी केली. त्यात ते बोलत होते.

पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेत कोकणातील शेतकऱ्याची जमीन धारणा कमी आहे. येथील शेतकऱ्यांना फारच कमी मदत मिळणार आहे. ही मदत म्हणजे सरकारने शेतकऱ्यांची केलेली थट्टा आहे.

दरम्यान, सरकारने जाहीर केलेल्या 10 हजार कोटींच्या पॅकेजमध्ये शेतीसाठी फक्त 5500 कोटी जाहीर करण्यात आले आहेत. 4500 कोटी रुपये इतर विभागासाठी आहेत. यामुळे महाविकासआघाडी सरकारने शेतकऱ्यांना केलेली मदत फारच तोकडी आहे, असं यावेळी प्रवीण दरेकर यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

ख्रिस जाॅर्डन-अर्शदिप सिंगची शानदार बाॅलिंग; पंजाबचा हैदराबादवर रोमांचक विजय

कोरोनारुपी रावणाचा नाश करुया- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

देवेंद्र फडणवीस साहेब काळजी घ्या आणि कोरोनावर मात करुन लवकर बरे व्हा; रोहित पवारांचं ट्विट

माझ्या भवितव्याबाबत कोणीही चिंता करु नये; पंकजा मुंडेंचा टोला