मुंबई : मुंबईतील आंबेडकर भवनमध्ये वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची पत्रकार परिषद पार पडली. यावेळी ते बोलत होते.
राज्यातील सार्वजनिक वाहतूक सेवा सुरळीत करावी तसेच मंदिरे खुली करण्यासाठी सर्व साधुसंतांना पाठिंबा देण्यात येईल, अशी माहिती प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी दिली. तसेच दिल्लीत केवळ मेट्रो बंद आहेत, मात्र इतर सर्व वाहतूक चालू आहे तर उत्तर प्रदेश मध्येही वाहतूक सेवा चालू आहेत. मग या बाबतीत महाराष्ट्र मागासलेला, ओला दाखवू नये, अशी विनंती प्रकाश आंबेडकर यांनी राज्य सरकारला केली आहे.
राज्यात आंतरराज्य जिल्हा बंदी आहे. ही जिल्हाबंदी हटवावी आणि नागरिकांना एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाण्यासाठी परवानगी द्यावी. मुख्यमंत्र्यांना आवाहन आहे की, माझे निर्देश घटनेसारखे वाटत असेल तर त्याचे पालन करावे. लोकांचे दळणवळण चालू व्हावे. त्याबाबत घोषणा करण्यात यावी, असंही प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, लवकरात लवकर वाहतूक चालू करा नाही तर पुन्हा आम्ही आंदोलन करु असा सूचक इशाराही प्रकाश आंबे़करांनी राज्य सरकारला दिला आहे.
महत्वाच्या घडामोडी-
मनसे शहराध्यक्षांच्या आत्महत्येनंतर राज ठाकरेंचं ट्विट; कार्यकर्त्यांना केलं ‘हे’ आवाहन
…नाहीतर राजीनामा द्या; भाजपच्या ‘या’ नेत्याचे नवाब मलिकांना आवाहन
“मी नेहमीच डॉक्टरांचा सन्मान केला आहे”
सुप्रसिद्ध दिग्दर्शक निशिकांत कामत यांचं निधन