एसटी कर्मचाऱ्यांना एका महिन्याचे वेतन आज मिळेल, तर दुसरे वेतन दिवाळीच्याआधी मिळेल- अनिल परब

0
210

मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांचे 3 महिन्याचे पगार राहीले आहेत. आज एक महिन्याचे वेतन मिळेल आणि दिवाळीच्या आधी दुसरे वेतन मिळेल, असं परिवहनमंत्री अनिल परब यांनी म्हटलं आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

कोरोनामुळे राज्य सरकार देखील आर्थिक संकटात आहे. पण हताश होऊ नका. आत्महत्या करु नका. हे तात्पुरते संकट आहे. एसटी कर्मचाऱ्यांचे जीवन पूर्वपद करण्याचा मी प्रयत्न करतोय. त्यामुळे टोकाचे पाऊल उचलू नका, असं आवाहन अनिल परब यांनी केलं.

दरम्यान, पूर्ण वेतन मिळावे अशी मागणी कर्मचाऱ्यांची आहे. यासाठी बॅंकेकडे कर्ज मागितलं आहे. राज्य शासनाला विनंती केली आहे, असंही अनिल परब यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

तीन तिघाडा अन् काम बिघाडा.. अशा पद्धतीने सरकार चाललंय; गिरीश महाजनांची महाविकास आघाडीवर टीका

“अर्णब गोस्वामींना अंतरिम जामीन नाहीच, कोर्टाने अर्ज फेटाळला”

“भाजपचे जळगाव येथील कार्यालय जाळण्याचा प्रयत्न”

“मुंबईत सर्वत्र फटाके फोडण्यास बंदी, महापालिकेनं केलं परिपत्रक जारी”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here