Home महाराष्ट्र “एसटी आंदोलन; अॅड. गुणरत्न सदावर्ते पोलिसांच्या ताब्यात”

“एसटी आंदोलन; अॅड. गुणरत्न सदावर्ते पोलिसांच्या ताब्यात”

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : राज्य शासनात विलिनीकरणाच्या मागणीसाठी पाच महिन्यांपासून आंदोलन करत असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईमधील सिल्व्हर ओक या निवास्थानाबाहेर आंदोलन सुरू केलं. यावेळी काही कर्मचाऱ्यांनी पवारांच्या निवासस्थानावर चपला देखील फेकल्या. या घटनेचे तीव्र पडसाद महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात उमटू लागले आहेत.

या संपूर्ण प्रकरणाची चाैकशी करून कठोर कारवाईचा इशारा पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिला होता. त्यानंतर आता एसटी कर्मचाऱ्यांचा लढा कोर्टात लढणारे वकील अॅड. गुणरत्न सदावर्ते यांची आता चाैकशी करण्यात येणार असून पोलिसांनी गुणरत्न सदावर्ते यांना ताब्यात घेतली असल्याची माहिती समोर येत आहे.

हे ही वाचा : “…त्यामुळे राज ठाकरेंना अटक करुन जेलमध्ये टाका”; अबू आझमी

दरम्यान, गुणरत्न सदावर्ते यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्या पत्नी जयश्री पाटील या गावदेवी पोलिस ठाण्यात दाखल झाल्या आहेत.

महत्वाच्या घडामोडी –

“राष्ट्रवादीची मोठी खेळी; ‘हा’ माजी आमदार हाती बांधणार घड्याळ”

संपादक पदावरचा माणूस ज्या शिव्या घालतो, त्या…; नारायण राणेंची संजय राऊतांवर टीका

शरद पवारांच्या ‘सिल्व्हर ओक’वर आक्रमक एसटी कर्मचाऱ्यांची धडक; चप्पलफेकही केली