“स्टाॅयनिस-वेडची मॅच विनिंग खेळी; पाकिस्तानला हरवून ऑस्ट्रेलियाचा फायनलमध्ये प्रवेश”

0
361

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

आजच्या वर्ल्ड कपच्या सामन्यात आॅस्ट्रेलिया विरूद्ध पाकिस्तान यांच्यात खेळल्या गेलेल्या सामन्यात आॅस्ट्रेलियाने पाकिस्तानचा 5 विकेट्सने पराभव करत टी-20 वर्ल्डकपच्या फायनलमध्ये प्रवेश केला.

पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 4 विकेट गमावत 176 धावा केल्या. पाकिस्तानकडून मोहम्मद रिझवानने सर्वाधिक 52 चेंडूत 67 धावा केल्या. तर फखर जमानने 32 चेंडूत नाबाद 55 धावा केल्या.  आॅस्ट्रेलियाकडून मिशेल स्टार्कने 2, तर पॅट कमिंस, अॅडम झैम्पाने 1 विकेट घेतली.

हे ही वाचा : “राष्ट्रवादीत पक्षप्रवेशाचा धुमधडाका; काँग्रेसच्या ‘या’ नेत्यासह 6 नगरसेवकांचा राष्ट्रवादीत प्रवेश”

धावांचा पाठलाग करताना आॅस्ट्रेलियाने हे लक्ष्य 1 षटक राखत 19 व्या षटकात पूर्ण केलं. आॅस्ट्रेलियाकडून मैथ्यू वेड व मार्कस स्टाॅयनिसने 41 चेंडूत नाबाद 82 धावांची भागीदारी करत आॅस्ट्रेलियाला विजय मिळवून दिला. आॅस्ट्रेलियाकडून सलामीवीर डेव्हिड वाॅर्नरने 49 धावांची खेळी केली. तर मैथ्यू वेडने 17 चेंडूत नाबाद 41, तर मार्कस स्टाॅयनिसने 31 चेंडूत नाबाद 40 धावा केल्या. तर पाकिस्तानकडून शादाब खानने 4 विकेट घेतल्या. तर शाहिन आफ्रिदीने 1 विकेट घेतली.

महत्वाच्या घडामोडी –

अमृता फडणवीसांची नवाब मलिकांना कायदेशीर नोटीस; म्हणाल्या, जाहीरपणे माफी मागा नाहीतर…

“जळगावमध्ये भाजपकडून शिवसेनेला खिंडार, शेकडो शिवसैनिकांचा भाजपमध्ये प्रवेश”

आता कुठे गेला राष्ट्रवादीच्या नेत्यांचा एसटी कर्मचाऱ्यांबद्दलचा पुळका?; सुधीर मुनगंटीवारांचा सवाल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here