आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
पुणे : महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना, पुणे जिल्हा आणि महाराष्ट्र राज्य मान्य खाजगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर महासंघ, पुणे जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने बिबवेवाडी येथील अण्णाभाऊ साठे स्मारक सभागृहात पुणे जिल्हास्तरीय नृत्याविष्कार स्पर्धा २०२५ आयोजित करण्यात आलेल्या होत्या. स्पर्धेकरिता तयार करण्यात आलेल्या तीन गटात ६५ शाळांनी नोंदणी केली होती. यातील दोन गटातील ४१ शाळांचे नृत्याविष्कार सादर झाले. या सर्व शाळांनी अव्वल दर्जाचे, अप्रतिम आणि डोळ्यांचे पारणे फेडणारे नृत्याविष्कारांचे सादरीकरण केले. सदर जिल्हास्तरीय नृत्याविष्कार स्पर्धेचे परीक्षक म्हणून प्रा. साहेबराव जाधव, श्रीमती मीना साळुंके व श्रीमती आरती केदारी यांनी काम पाहिले.
ही बातमी पण वाचा : MVM सेमी इंग्लिश शाळेत बोरन्हाण संपन्न, काळे कपडे घालून विद्यार्थ्यांचा उत्साह
सदर कार्यक्रमाचे उद्घाटनावेळी इंडियन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष रमेश गायकवाड, सर्कल ऑफिसर,व्यंकटेश चिरमुल्ला, युवा उद्योजक रणजित हरपुडे, राज्य महासंघाचे मुख्य सचिव विठ्ठल उरमुडे,नगर महासंघाचे सचिव शेखर उंडे, नगर महासंघाचे कार्याध्यक्ष अन्सार शेख, शिक्षक सेनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सुनील भाऊ जगताप, प्रादेशिक सचिव डॉ. संजय नायडू, पुणे जिल्हा अध्यक्ष माध्यमिकचे रविंद्र वाघ, शिक्षक सेनेचे जिल्हा सरचिटणीस रणजित बोत्रे, शिक्षक सेनेच्या महिला विभागाचे अध्यक्ष श्रीमती नीता गुंजीकर महासंघाचे पुणे जिल्हा अध्यक्ष नारायण शिंदे, महासंघ पुणे जिल्हा सचिव जितेंद्र पायगुडे, राज्य सहसचिव विकास थिटे, राज्य उपाध्यक्ष ज्ञानेश्वर गायकवाड, महासंघाचे पुणे जिल्हा खजिनदार विकास मोरे, सहसचिव उत्तम कांगुने, कार्याध्यक्ष सुदाम करंजावणे, शहराध्यक्ष संदीप सातपुते, विभागीय उपाध्यक्ष रेवणनाथ पवार, उपाध्यक्ष शशिकांत किंद्रे, शिक्षकेतर प्रमुख मारुती माळवदकर उपस्थित होते.
सदर स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ आणि गट क्रमांक तीन मधील उर्वरित नृत्याविष्कार लवकरच घेण्यात येणार असल्याचे महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सुनील भाऊ जगताप यांनी सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या –
अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांची मोठी घोषणा; 12 लाखांपर्यंत उत्पन्न आयकरमुक्त
शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का; ‘या’ बड्या नेत्याचा तडकाफडकी राजीनामा
‘उद्धव ठाकरे यांचं सूचक वक्तव्य? म्हणाले, राजकारणात उद्या…’