देवेंद्र फडणवीस यांना अमृता फडणवीसांकडून खास शुभेच्छा; म्हणाल्या…

0
168

मुंबई राज्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आज 50 वाढदिवस आहे. त्यांना वाढदिवसानिमित्त अनेकांनी शुभेच्छा दिल्या. मात्र त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी ट्विटरवरुन एक खास फोटो ट्विट करत देवेंद्र यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

“देवेंद्र फडणवीस यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. निस्वार्थ सेवा, पारदर्शकता आणि कष्ट या सर्व गुणांचा समावेश असणारी ही व्यक्ती दिवसोंदिवस समाज उपयोगी आणि लोकहिताची कामं करत असून या कामासाठी त्यांनी स्वत:चे आयुष्य वाहून घेतलं आहे. तुम्ही मला आणि माझ्यासारख्या अनेकांना मानवतेची सेवा करण्याची प्रेरणा दिली आहे,”  असं  कॅप्शन देत अमृता यांनी देवेंद्र फडणवीस शुभेच्छा दिल्या आहेत.

दरम्यान, अमृता फडणवीस यांनी ट्विवटरवरुन देवेंद्र यांच्यासोबतचा एक जुना फोटो शेअर केला आहे. या ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाइट फोटोमध्ये दोघेही हसताना दिसत आहेत. फोटोला कॅप्शन देताना अमृता यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलला टॅग केलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

कोंबडं झाकलं तरी सूर्य उगवणारच; राज्य सरकारने काढलेल्या जीआरवर प्रविण दरेकरांची टीका

देशात ‘अमर,अकबर, अँथनी’ एकत्र राहू नयेत असं भाजपाला वाटतं- सत्यजीत तांबे

कोरोना अपयश लपवण्यासाठी भाजपकडून पायाभरणीचा कार्यक्रम- बाळासाहेब थोरात

“अमृतासारखं दूध ओतून देतानाचा त्रास लक्षात घ्या”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here