Home महाराष्ट्र शिवसेना नेते आदित्य ठाकरेंविषयी बोलताना खासदार धैर्यशील माने यांना अश्रू अनावर, म्हणाले…

शिवसेना नेते आदित्य ठाकरेंविषयी बोलताना खासदार धैर्यशील माने यांना अश्रू अनावर, म्हणाले…

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

कोल्हापूर : शिवसेनेचे आमदार एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरोधात बंड पुकारलं. या बंडामुळे शिवसेनेत गळती सूरू झाली आहे. 40 आमदारांनंतर आता शिवसेनेच्या 12 खासदार शिंदे गटात सामील झाले. आता कोल्हापूर जिल्ह्यातील खासदार धैर्यशील माने यांचाही समावेश होता. यानंतर शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी इचलकरंजी मतदारसंघात जाऊन शिवसैनिकांशी संवाद साधला होता.

आदित्य ठाकरेंनी यावेळी बोलताना, इथल्या खासदारांना मी माझे मित्र मानत होतो. पण त्यांनीच पाठीत खंजीर खुपसला, असं आदित्य ठाकरे म्हणाले होते. यावरून आता धैर्यशील माने यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

हे ही वाचा : …तर चंद्रशेखर बावनकुळेंना मुख्यमंत्रीपदाची संधी; नितीन गडकरींच्या वक्तव्याने खळबळ

शिवसेना नेतृत्वाच्या मी अत्यंत जवळ होतो, त्यामुळे ठाकरे यांच्याविषयी माझ्या मनात आयुष्यभर कृतज्ञता राहणार आहे, असं धैर्यशील माने म्हणाले. तसेच आदित्य ठाकरेंविषयी बोलताना, धैर्यशील माने यांना अश्रू अनावर झालं. पर्यावरणासंदर्भात मी सुचवलेल्या कामांपैकी फक्त एकच काम झाल्याचे सांगत त्यांनी आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला.

आदित्य ठाकरेंनी इचलकरंजी मतदारसंघात आल्यानंतर केलेलं विधान बरोबर आहे. ठाकरे कुटुंब हे माझ्या जिव्हाळ्याचा विषय असून त्यांनी मला वेळोवळी साथ दिली. पण माझ्या मतदारसंघात मी सुचवलेल्या कामांपैकी फक्त एकच काम मार्गी लागून कोणत्याही कामांना मान्यता मिळालेली नाही. त्यांनी प्रयत्न केला, पण त्याचा निर्णय मात्र झाला नाही. महाविकास आघाडी हे तीन पक्षाचे सरकार असल्यामुळे त्यात अडचणी येत होत्या. मात्र त्यांचा दृष्टीकोन सकारात्मक होता. मित्र म्हणून आदित्य ठाकरे यांचा माझ्याबाबतचा जिव्हाळा राजकारणापलीकडे आहे, असं म्हणत धैर्यशील माने यांना अश्रू अनावर झाले.

महत्त्वाच्या  घडामोडी –

“शिवतीर्थवर फडकला तिरंगा, राज ठाकरेंच्या नातवाचा क्यूट फोटो व्हायरल”

“सांगलीत मोठा राजकीय भूकंप?; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे-विश्वजीत कदम यांच्यात बंददाराआड चर्चा”

शिंदे गटात सामील झालेले ‘हे’ आमदार परतीच्या वाटेवर?; “महाराष्ट्राचे कुटुंबप्रमुख” म्हणून केला उद्धव ठाकरेंचा उल्लेख