रायगड : मी राजकारणी नाही, मी राजकारण करत नाही. पण मधल्या काळात लोक माझ्यावर नाराज झाले. पण मला समाजाला वेठीस धरायचं नाही. धरणार नाही. दिशाभूल करणं आमच्या रक्तात नाही, असं म्हणतच चुकलो असेल तर मी दिलगिर आहे, असं खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटलं.
दरवर्षी 6 जून हा दिवस शिवराज्याभिषेक सोहळा म्हणून साजरा केला जातो. 348 व्या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्ताने रायगडावर भव्य सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी ते बोलत होते.
दरम्यान, लोकं नाराज झाले तरी चालतील. पण मी समाजाला वेठीस धरणार नाही. दिशाभूल करणं आमच्या रक्तात नाही. शिवभक्तांचा मला पाठिंबा आहे. तर काही शिवभक्त माझ्यावर नाराज आहेत. पण कोरोनाचं संकट असल्याने काहीच करता येत नाही. माझं काही चुकलं असेल तर मला माफ करा. आपण जगलो तर महाराजांचे विचार पुढे घेऊन जाऊ, असंही संभाजीराजेंनी यावेळी म्हटलं.
महत्वाच्या घडामोडी –
“विनापरवानगी मोर्चा काढल्याबद्दल विनायक मेटे आणि नरेंद्र पाटील यांच्यावर गुन्हा दाखल”
शिवराज्याभिषेक हा महाराष्ट्राच्या हृदयावर कोरलेला सुवर्ण क्षण- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
रायगडाच्या दरबारात आपण उभे राहतो तेव्हा एक सकारात्मक ऊर्जेची भावना मनात येते- जयंत पाटील
भाजपला श्रेय नको म्हणूनच महाविकास आघाडी सरकारनं मराठा आरक्षण रद्द केलं- प्रवीण दरेकर