Home मनोरंजन सोनू सुद जर यूपीमध्ये असता तर योगी सरकारने…; यूपी काँग्रेसचा योगी सरकारवर...

सोनू सुद जर यूपीमध्ये असता तर योगी सरकारने…; यूपी काँग्रेसचा योगी सरकारवर निशाणा

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने लॉकडाउन जाहीर केलं. त्यामुळे हातावर पोट असणाऱ्या अनेक स्थलांतरित मजुरांचे हाल होत आहेत. लॉकडाउनमुळे त्यांनी आपापल्या घरी परतण्याचा निर्णय घेतला. त्यांना चालत घरी जावं लागत आहे. या मजुरांना घरी पोहोचविण्यासाठी बॉलिवूड अभिनेता सोनू सूद आणि त्याची संपूर्ण टीम प्रयत्न करत आहे. यावरून यूपी काँग्रेसने योगी सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे.

‘खर तर आभारच मानायला हवे की, सोनू सूद हे महाराष्ट्रात चांगले काम करून, उत्तर प्रदेशमधील लोकांची मदत करत आहेत. उत्तर प्रदेशमध्ये असता तर यूपी सरकार एसटीला स्कुटर बोलले असते, त्यानंतर त्यांच्या प्रकृतीशी संबंधीत कारणं दिली असती आणि सोनू सूदला तुरुंगात टाकलं असतं, असं ट्विट करत यूपी काँग्रेसने योगी सरकारवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला.

दरम्यान, सोनूने महाराष्ट्र सरकारकडून विशेष परवानगी घेऊन काही गाड्यांची सोय केली आहे. या गाड्यांमार्फत महाराष्ट्रातील मजूरांना त्यांच्या गावी नेऊन सोडले जात आहे.

महत्वाच्या घडामोडी –

भाजपसोबत जावून आपण महाराष्ट्रद्रोह तर करत नाही ना?; जयंत पाटलांचा सवाल

“…तर ठाकरे सरकारने 6 महिने पुर्ण केले या आनंदात विरोधी पक्षाला श्रीखंड-पुरीचे जेवन घालता आले असते”

“शरद पवारांची इच्छा असेल तरच महाविकास आघाडीचं सरकार पडेल”

…मग कळेल रस्त्यावर कोण; नारायण राणेंवर केलेल्या टीकेला निलेश राणेंचं प्रत्यृत्तर