मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी लिहिलेलं पत्र सध्या चर्चेत आहे. महाराष्ट्रातील अनुसूचित जाती-जमातीच्या लोकांचे प्रमाण लक्षात घेऊन त्यानुसार त्यांच्या कल्याण योजनांसाठी राज्याच्या अर्थसंकल्पात पुरेशा निधीची तरतूद करावी, अशी सूचना करणारे पत्र सोनिया गांधींनी उद्धव ठाकरेंना लिहिले आहे. यावर भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
हे महाविकास आघाडीचं सरकार दलीत,आदिवासी आणि वंचित समूहाच्या विरोधातील आहे, हेच मी इतक्या दिवसांपासून सांगत होतो. मात्र आता मा.सोनियाजी गांधींनीच पत्र लिहून महाविकास आघाडी सरकाराच्या नाकर्तेपणाची पोचपावती दिली आहे., असं ट्विट करत पडळकरांनी ठाकरे सरकारला टोला लगावला आहे.
हे महाविकास आघाडीचं सरकार दलीत,आदिवासी आणि वंचित समूहाच्या विरोधातील आहे, हेच मी इतक्या दिवसांपासून सांगत होतो. मात्र आता मा.सोनियाजी गांधींनीच पत्र लिहून महाविकास आघाडी सरकाराच्या नाकर्तेपणाची पोचपावती दिली आहे. @CMOMaharashtra @abpmajhatv @TV9Marathi @INCMaharashtra pic.twitter.com/6c5LtHeRwE
— Gopichand Padalkar (@GopichandP_MLC) December 19, 2020
महत्वाच्या घडामोडी-
विकासाशी शत्रू सारखे वागून महाराष्ट्र द्रोह का करताय?; आशिष शेलारांचा सवाल
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी प्रवक्ते मा. गो. वैद्य यांचं निधन”
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना दिल्लीपर्यंत नेऊ, शिवसेनेचा पंतप्रधान व्हायलाच हवा- संजय राऊत
“परळ ब्रँड शिवसैनिक गेला; माजी खासदार मोहन रावले यांचं निधन”