आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
कोल्हापूर : भाजप नेते किरीट सोमय्या यांनी परिवहनमंत्री अनिल परब यांचा दापोलीतील रिसॉर्ट पाडणार असल्याचे म्हटले आहे. ते दापोलीला प्रतीकात्मक हातोडा घेऊन गेले आहेत. यावरून शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी प्रतिक्रिया दिली.
कुणी हातोडा, कुणाला कुदळ, कुणाला फावडा जे घ्यायचं आहे ते घ्या; पण हा शिवरायांचा मर्द मराठा मावळा दिल्लीच्या तख्तासमोर नमणारा नाही. तो लढतही राहणार आणि जिंकतही राहणार, असं विनायक राऊत म्हणाले. ते कोल्हापूरमध्ये माध्यमांशी बोलत होते.
हे ही वाचा : जयदत्त क्षीरसागर अॅक्शन मोडमध्ये; राष्ट्रवादी काँग्रेसचे पाच नेते फोडले, ‘या’ दिवशी करणार शिवसेनेत प्रवेश
दरम्यान, यावेळी बोलताना विनायक राऊतांनी राणे कुटूंबावरही निशाणा साधला. नितेश राणे, निलेश राणे हे आमच्यासाठी संपलेलं गणित आहे. बेळगावसह निपाणी कारवार येथील सीमाभागात मराठी जनतेवर अत्याचार सुरू आहेत आणि महाराष्ट्रातील भाजप नेते मूग गिळून गप्प बसले आहेत. त्यामुळे विधानसभेत केलेला निषेधाचा ठराव योग्यच आहे. आम्हीदेखील संसदेत याबाबत पत्र दिलं. त्यावेळी भाजपने त्यावर सही करण्यास नकार दिला. यावरून भाजपचे सीमाभागातील मराठी माणसाबाबत दुट्टपी धोरण दिसून येते, अशी टीकाही विनायक राऊतांनी यावेळी केली.
महत्वाच्या घडामोडी –
आमदारांना मोफत घरं देण्याच्या निर्णयावरुन मनसेची मुख्यमंत्र्यांवर टीका
जळगावमध्ये भाजप आणि शिवसेनेत खडाजंगी
करुणा शर्मा -धनंजय मुंडेंची प्रेमकहाणी मराठीत येणार- करुणा शर्मा