पक्ष सोडताना कुणाला तरी व्हिलन ठरवावं लागतं, खडसेंनी मला व्हिलन ठरवलं- देवेंद्र फडणवीस

0
155

मुंबई : भाजपचे जेष्ठ्य नेते एकनाथ खडसे यांचं राष्ट्रवादी प्रवेशावर शिक्कामोर्तब झाला आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील याबाबत अधिकृत घोषणा केली. यावर माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

नाथाभाऊंनी राजीनामा दिला हे दुर्देव आहे. त्यांनी राजीनामा दिला नसता तर चांगलं झालं असतं. माझ्याबद्दल त्यांना काही तक्रारी होत्या तर त्यांनी त्या वरिष्ठांना सांगायला हव्या होत्या,असं  म्हणत पक्ष सोडताना कुणाला तरी व्हिलन ठरवावं लागतं. त्यांनी मला व्हिलन ठरवलं, देवेंद्र फडणवीस म्हणाले.

दरम्यान, आता ते जे काही सांगत आहेत. ते अर्धसत्य आहे. त्यामुळे योग्यवेळ येईल तेव्हा मी नक्की बोलेल,असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

एकनाथ खडसेंच्या राजीनाम्यानंतर पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया; म्हणाल्या…

कांद्याचे दर वाढले म्हणून बोंबलू नका परवडत नसेल तर लसूण, मुळा खा- बच्चू कडू

चिल्लर… थिल्लर गोष्टींकडे बघायला मला वेळ नाही; फडणवीसांच्या टीकेला मुख्यमंत्र्यांचं प्रत्युत्तर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here