आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
उस्मानाबाद : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आज पक्षाच्या मेळाव्यानिमित्त आज उस्मानाबाद दौऱ्यावर होते. यावेळी पवारांनी येथील कार्यक्रमात बोलताना विविध मुद्यांवर भाष्य केलं.
सतत 52 वर्ष काम करण्याची संधी मला दिली. त्या समाजाचे आणि लोकांच्या भविष्य उज्वल करण्याची जबाबदारी माझी आहे. चार चार वेळा मुख्यमंत्री केलं 82 वर्षाचा झालो म्हणजे म्हातारा नाही, मी कधीच थकणार नाही, असं शरद पवार म्हणाले. तसेच पवारांनी यावेळी बोलताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या मी पुन्हा येईन या वक्तव्यावर देखील टोला लगावला.
हे ही वाचा : “चंद्रपूरमध्ये काँग्रेसचा भाजपला दणका, ‘या’ मोठ्या नेत्यानं केला काँग्रेसमध्ये प्रवेश”
संकट काळात राजकारण आणायचं नसतं. काही लोकांना जमत नाही,ते कुठेही राजकारण करतात. निवडणूक लागायाच्या अगोदर, निकाला आधीच मी येणार अस सांगत होते, पण आम्ही येऊ दिल नाही, असा टोला शरद पवार यांनी फडणवीसांना लगावला. तसेच ही आघाडी यशस्वी झाली आहे. उद्धव ठाकरे चांगलं काम करत आहेत. सत्तेसाठी नाही तर महाराष्ट्रातील जनतेसाठी ही आघाडी काम करतेय, असंही पवार म्हणाले.
महत्वाच्या घडामोडी –
पंतप्रधानांच्या समोरच अजित पवारांचा राज्यपालांना टोला, म्हणाले…
मला मनसेच्या प्रत्येक कार्यालयात शिवरायांच्या ‘त्या’ 2 ओळी फ्रेम करून ठेवायच्या आहेत- राज ठाकरे
…त्यामुळे राज्यपालांना टार्गेट करणं अतिशय अयोग्य आहे; देवेंद्र फडणवीसांकडून राज्यपालांची पाठराखण