आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या जवळपास 40 आमदारांसोबत बंडखोरी केली आहे. त्यामुळं महाविकास आघाडी सरकार अडचणीत आलं आहे. याच पार्श्वभूमीवर आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
बंडखोरातही बंडखोरी होऊ शकते, काही आमदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा संजय राऊत यांनी यावेळी केला. तसेच आम्हांलसाही रेडिसन ब्ल्यू हाॅटेलमध्ये कार्यक्रमासाठी 40 खोल्या लागत होत्या. त्याबाबत आम्ही हाॅटेल व्यवस्थापनाला मेल केला आहे. मात्र अद्यापही मेलला उत्तर आलं नाही, असं म्हणत संजय राऊतांनी आसामच्या मुख्यमंत्र्यांना टोला लगावला आहे.
हे ही वाचा : “तुम्ही आमचे सहा नगरसेवक फोडले, शिंदेंनी तुमचे 36 आमदार फोडले; मनसेनं शिवसेनेला डिवचलं”
दरम्यान, जरा संयम ठेवा, बंडखोरांमध्येही बंडखोरी होऊ शकते. काही आमदार आमच्या संपर्कात आहेत. माझं बंडखोर आमदारांना आवाहन आहे की, त्यांच्यात जर धमक असेल तर त्यांनी राजीनामे द्यावेत आणि पुन्हा निवडणूक लढवावी, असं आवाहन संजय राऊतांन बंडखोरांना यावेळी केलं.
महत्त्वाच्या घडामोडी –
महाराष्ट्रातील राजकीय भूकंपावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं सूचक वक्तव्य, म्हणाले…
आमदारांच्या बंडामागे खरंच मुख्यमंत्र्यांचा हात?; स्वत: उद्धव ठाकरेंनी दिलं उत्तर, म्हणाले…
“आम्ही शिवसेना सोडून कुठेही जाणार नाही; शिंदे गटातील ‘या’ महिला आमदाराचा व्हिडिओ व्हायरल”