Home पुणे शिंदे गट आणि भाजपामधील काही आमदार आमच्या संपर्कात; राष्ट्रवादी नेत्याचा गौप्यस्फोट 

शिंदे गट आणि भाजपामधील काही आमदार आमच्या संपर्कात; राष्ट्रवादी नेत्याचा गौप्यस्फोट 

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

पुणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटातील तीन आमदार आणि भारतीय जनता पक्षाचे काही आमदार राष्ट्रवादीच्या संपर्कात आहेत, असा मोठा गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषदेतील आमदार अमोल मिटकरी यांनी दौंडमध्ये माध्यमांशी बोलताना केला आहे.

मंत्रिमंडळाचा विस्तार होत नसल्याने आमदारांमध्ये मोठी अस्वस्थता पसरली आहे. त्या अस्वस्थ आमदारांमधील शिंदे गटातील तीन आमदार आणि भाजपाचे काही आमदार राष्ट्रवादीच्या संपर्कात आहेत. शिंदे गटातील हे तीन आमदार विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील आहेत, ते राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या संपर्कात आहेत. याशिवाय भाजपचेही काही आमदार राष्ट्रवादीच्या संपर्कात आहेत. मात्र, त्यांची संख्या आताच सांगणार नाही,असं अमोल मिटकरी म्हणाले आहेत.

हे ही वाचा : चंद्रकांत पाटलांच्या शाईफेक प्रकरणावर, आता चित्रा वाघ यांची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाल्या…

आमदारांवर विश्वास नसल्यामुळे मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून नागपूरमधील हिवाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आलेला नाही. ज्या दिवशी मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, त्याच दिवशी शिंदे-फडणवीस यांचे सरकार कोसळेल, असा दावाही अमोल मिटकरी यांनी केला आहे.

महत्त्वाच्या घडामोडी –

“ठाकरेंच्या शिवसेनेत इनकमिंग सूरूच; आता ‘या’ नेत्यानं हाती बांधलं शिवबंधन”

…तर शिवाजी महाराजांनी, अब्दुल सत्तारांचा कडेलोट केला असता; अमोल मिटकरींचा हल्लाबोल

मोठी बातमी: चंद्रकांत पाटील यांच्यावर पिंपरीत शाईफेक